मुंबई Devara Part 1 :साऊथचा सुपरस्टार ज्युनियर एनटीआर आणि जान्हवी कपूर अभिनीत ॲक्शन ड्रामा चित्रपट 'देवरा पार्ट 1' रिलीजसाठी सज्ज आहे. या चित्रपटाचा नुकताच ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून चाहते 'देवरा पार्ट 1'च्या रिलीजच्या तारखेची वाट पाहात नाहीत. हा चित्रपट 27 सप्टेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. दरम्यान यापूर्वी 'देवरा पार्ट 1'च्या प्रेक्षकांसाठी आनंदाची बातमी आली आहे. हा चित्रपट हॉलिवूडच्या बियॉन्ड फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्रदर्शित होणार आहे. या फेस्टमध्ये हॉलिवूडचे अनेक दिग्गज कलाकार सहभागी होतील. ज्युनियर एनटीआरच्या आगमी चित्रपटाचं आगाऊ बुकिंग हे उद्या नाही तर पुढच्या आठवड्यात सुरू होईल.
'देवरा पार्ट 1'चा ग्लोबल प्रीमियर : 'देवरा पार्ट 1'चा ग्लोबल प्रीमियर रिलीजच्या एक दिवस आधी म्हणजेच 26 सप्टेंबर रोजी होईल. लॉस एंजेलिस येथील हॉलीवूडमधील आयकॉनिक इजिप्शियन थिएटरमध्ये संध्याकाळी 6.30 वाजता हा चित्रपट दाखवण्यात येईल. 'देवरा पार्ट 1' हा पहिला भारतीय चित्रपट आहे ज्याचा येथे प्रीमियर होत आहे. या चित्रपटानं उत्तर अमेरिकेत प्री-सेल्समध्ये मोठा नफा कमावला आहे. 'देवरा पार्ट 1' ची याठिकणी दहा लाख तिकिटं विकली गेली आहेत. या चित्रपटानं उत्तर अमेरिकेत प्री-सेल्समध्ये जलद गतीनं तिकिटे विक्री केली. 'देवरा पार्ट 1' चित्रपटाची निर्मिती कोराटाला शिवा यांनी केली आहे. 'देवरा पार्ट 1 ' चित्रपटामध्ये बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान खलनायकाची भूमिका साकारत आहे.