महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी - दादा साहब फाल्के अवार्ड 2024 विजेता

Dadasaheb Phalke Awards 2024: दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा काल 20 फेब्रुवारी रोजी मुंबईमध्ये आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात 'जवान' आणि 'अ‍ॅनिमल' चित्रपटाचा बोलबोला होता.

Dadasaheb Phalke Awards 2024
दादासाहेब फाळके अवार्ड 2024

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 21, 2024, 1:42 PM IST

मुंबई - Shah Rukh Khan Phalke Awards 2024: दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार हा सर्वात प्रतिष्ठित पुरस्कारांपैकी एक आहे. हा पुरस्कार सोहळा मंगळवारी, 20 फेब्रुवारी रोजी मुंबईत आयोजित करण्यात आला होता. आता या विशेष प्रसंगी शाहरुख खान, नयनतारा, अनिल कपूर, करीना कपूर खान, संदीप रेड्डी, राणी मुखर्जी, शाहिद कपूर यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. या अवॉर्ड फंक्शनमध्ये शाहरुखच्या 'जवान' आणि रणबीर कपूरच्या 'अ‍ॅनिमल'ला अव्वल मानांकन मिळालं. तर विकी कौशल स्टारर 'सॅम बहादूर'च्या चित्रपटाला एका विशेष पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं.

विजेत्याची यादी

सर्वोत्कृष्ट खलनायक - बॉबी देओल (अ‍ॅनिमल)

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - संदीप रेड्डी वंगा (अ‍ॅनिमल)

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - नयनतारा (जवान)

सर्वोत्कृष्ट अभिनेता (समीक्षक) - विकी कौशल (सॅम बहादूर)

सर्वोत्कृष्ट अभिनेता - शाहरुख खान (जवान)

सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक - अनिरुद्ध रविचंदर

सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक मेल- वरुण जैन

सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका - शिल्पा राव

वेब सीरीजमधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (समीक्षक) - करिश्मा तन्ना (स्कूप)

आउटस्टेडिंग कंट्रीब्यूशन इन म्यूजिक इंडस्ट्री - के. जे. येसुदास

आउटस्टेडिंग कंट्रीब्यूशन इन फिल्म इंडस्ट्री - मौसमी चॅटर्जी

वर्षातील दूरदर्शन मालिका – घुम है किसी के प्यार में

टेलीव्हिजन मालिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेता - नील भट्ट

टेलीव्हिजन मालिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - रुपाली गांगुली

विकी कौशलचा व्हिडिओ व्हायरल : अभिनेता विकी कौशल या पुरस्कार कार्यक्रमाला उपस्थित नव्हता. दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कार 2024 मध्ये विकी कौशलनं 'सॅम बहादूर' चित्रपटातील त्याच्या शानदार अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा (समीक्षक) पुरस्कार जिंकला आहे. विकी तिथे उपस्थित नसला तरी त्यानं एक व्हिडिओ संदेश पाठवला आणि आनंद व्यक्त केला.

विकी कौशलनं मानलं आभार : विकी कौशलनं या व्हिडिओत म्हटलं, ''सॅम बहादूरमधील माझ्या कामासाठी मला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा (समीक्षक) पुरस्कार दिल्याबद्दल दादासाहेब फाळके पुरस्काराच्या ज्युरीचे खूप खूप आभार. मला माफ करा, काही कारणास्तव मला मुंबईबाहेर जावं लागल्यानं मी आज कार्यक्रमाला येऊ शकलो नाही. हा खूप मोठा सन्मान आहे. मी माझ्या दिग्दर्शिका मेघना गुलजार, माझे निर्माते रॉनी स्क्रूवाला आणि' सॅम बहादूर'च्या संपूर्ण टीमचे आभार मानतो. मी फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ सर यांच्या कुटुंबियांचे त्यांच्या मदतीबद्दल, प्रेमाबद्दल आणि समर्थनाबद्दल आभार मानू इच्छितो. हा अवार्ड भारतीय सैन्याला समर्पित आहे.''

हेही वाचा :

  1. दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल अवॉर्ड्समध्ये शाहरुखने मारली बाजी
  2. माफियांचा बंदोबस्त करणाऱ्या युपी मुख्यमंत्र्याची भूमिका साकारणार मनोज जोशी
  3. विराट-अनुष्काला पुत्ररत्न, मुलाचं ठेवलं 'हे' अनोखं नाव

ABOUT THE AUTHOR

...view details