मुंबई -Aditya Roy Kapoor and Chunky Pandey :अभिनेत्री अनन्या पांडे आणि अभिनेता आदित्य रॉय कपूर यांच्या नात्याबद्दलच्या चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरू आहेत. अलीकडेच अनन्या आणि आदित्यच्या ब्रेकअपच्या बातम्या समोर आल्या होत्या. दरम्यान, चंकी पांडेनं नुकतेच त्याच्या मुलीच्या एक्स बॉयफ्रेंडबरोबरचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. या फोटोंमध्ये चंकी आणि आदित्य समुद्रकिनारी एंजॉय करताना दिसले होते. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या जाहिरातीच्या शूटिंगदरम्यान दोघांचे हे फोटो काढण्यात आले होते. आता या दोघांचे फोटो पाहून यूजर्स भरभरून कमेंट्स देत आहेत.
चंकी पांडेनं आदित्य रॉयबरोबर केला फोटो शेअर : चंकी पांडे आणि आदित्य रॉय कपूरला एकत्र पाहून एका यूजरनं लिहिलं "आदित्य हा चंकीचा जावई झाला असता." दुसऱ्या एकानं लिहिलं, "चंकीचा आदित्य जावई आहे, एकत्र सुंदर दिसत आहेत." आणखी एकानं लिहिलं, "मुलीला देखील बाहेर घेऊन जात जा." याशिवाय काहीजण या पोस्टवर हार्ट आणि फायर इमोजी पोस्ट करत आहेत. तसेच या पोस्टवर एका युजरच्या कमेंटला खुद्द चंकी पांडेनं लाईक केलं आहे. चंकी पांडेला काही यूजर्स विविध प्रकारचे प्रश्नही विचारत आहेत. या फोटोवर एका यूजर्सनं म्हटलं, "अनन्या आणि आदित्य अजूनही एकत्र आहेत का?" आता सोशल मीडियावर चंकीनं शेअर केले फोटो खूप व्हायरल होत आहेत.