मुंबई -जेनेलिया आणि रितेश देशमुख हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध जोडप्यांपैकी एक आहेत. या दोघांचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. या जोडप्यानं 3 फेब्रुवारी 2012 रोजी मराठमोळ्या पद्धतीनं विवाह केला. यानंतर त्यांनी ख्रिश्चन पद्धतीनुसार लग्न केलं. जेनेलिया ही सासरी आल्यानंतर सर्व मराठी सण मोठ्या उत्साहाने साजरे करते. आता रितेश आणि जेनेलिया याच्याकडे ख्रिसमस सेलिब्रेशनची जोरदार तयारी सुरू झाली आहे. या सणासाठी रितेशचे दोन्ही मुले आपल्या घरी ख्रिसमस ट्री सजवत असल्याचा व्हिडिओ जेनेलियानं शेअर केला आहे. रियान आणि राहीलची मदत त्यांचे वडील रितेश देखील व्हिडिओमध्ये करताना दिसत आहे.
ख्रिसमसची तयारी : गणेशोत्सव, दिवाळी हे सण मोठ्या उत्साहाने साजरे केल्यानंतर आता रितेश आणि जेनेलियाच्या ख्रिसमस सेलिब्रेशनची जोरदार करण्याच्या तयारीत आहेत. रियान आणि राहीलचा ख्रिसमस ट्री सजवत असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. दरम्यान जेनेलिया शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तिचा मोठा मुलगा आणि रितेश दोघे मिळून ख्रिसमस ट्री वरचा भाग सजवत आहे, तर, धाकटा मुलगा राहील यावेळी ख्रिसमस ट्रीच्या खालील बाजू सजावट करत आहे. जेनेलियानं या व्हिडिओला शेअर करत यावर कॅप्शन देत लिहिलं 'हळुहळू ख्रिसमस सेलिब्रेशनची सुरुवात होत आहे.'