मुंबई - Chhota Bheem Teaser: मुलांच्या आवडत्या कार्टून शो 'छोटा भीम'चा पहिला ॲक्शन चित्रपट रुपेरी पडद्यावर काही दिवसात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाच्या निर्मात्यानं आज, 14 मार्च रोजी ' 'छोटा भीम एंड द कर्स ऑफ दमयान'चा टीझर लॉन्च केला आहे. या टीझरनं चाहत्यांना प्रभावित केलं आहे. 'छोटा भीम एंड द कर्स ऑफ दमयान'नं कार्टून शोमधील पात्र मोठ्या पडद्यावर आणले आहेत. अनुपम खेर यांनी गुरुवारी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर 'छोटा भीम एंड द कर्स ऑफ दमयान' टीझर शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं, 'छोटा भीम आता मोठ्या पडद्यावर येणार आहे. ढोलकपूरचे रक्षण करण्यासाठी भीम आणि त्याच्या बेधडक टोळीत सामील व्हा. 'छोटा भीम एंड द कर्स ऑफ दमयान' 24 मे 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.''
'छोटा भीम एंड द कर्स ऑफ दमयान'चा टीझर रिलीज :'छोटा भीम एंड द कर्स ऑफ दमयान' टीझरबद्दल बोलायचं झालं तर या चित्रपटाचा टीझर हा 1.09 मिनिटांचा आहे. या चित्रपटामध्ये जबरदस्त व्हिएफएक्स हेवी शॉट्स आहेत, जे आकर्षक दिसत आहेत. 'छोटा भीम एंड द कर्स ऑफ दमयान' चित्रपटाच्या टीझरमध्ये अनुपम खेर यांची झलकही पाहायला मिळाली आहे. टीझरमध्ये आता भीमचे मित्र ढोलकपूर शहर वाचवताना दिसत आहे. 'छोटा भीम' लोकप्रिय कार्टून शो मोठ्या पडद्यावर आणल्याबद्दल लोकांनी निर्मात्यांचे कौतुक केलं आहे. राजीव चिल्का यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि निर्मिती केली आहे. राजीव यांनी कृष्णा कार्टून आणि छोटा भीमसह अनेक व्यंगचित्रांचे निर्माते आहेत.