मुंबई - 'बिग बॉस 11' मध्ये अभिनेत्री हिना खान शोचे पहिली रनर अप ठरली होती. सौंदर्यवती असलेल्या या गोड टीव्ही अभिनेत्रीनं पुन्हा एकदा बिग बॉस शोमध्ये प्रवेश केला आहे. बिग बॉस 18 च्या 'वीकेंड का वार' या भागात कर्करोगग्रस्त हिना खान दिसणार आहे. 'बिग बॉस 18' च्या नवीन प्रोमोमध्ये हिना खान दिसत आहे. सलमान खाननं हिना खानचं मनापासून स्वागत केलं आहे. सलमान खाननही हिना खानच्या धाडसाचे कौतुक केलं आहे. 'बिग बॉस 18' च्या लेटेस्ट प्रोमोमध्ये सलमाननं दिलेल्या दिलास्यानंतर हिना खान रडताना दिसत आहे. हिना खान कॅन्सरने ग्रस्त असल्याचं सलमान खानलाही माहीत आहे.
कॅन्सरग्रस्त हिना खानची 'बिग बॉस 18'मध्ये एन्ट्री, सलमानच्या दिलास्यानंतर रडली अभिनेत्री - HINA KHAN ENTRY IN BIGG BOSS 18
हिना खाननं पुन्हा एकदा 'बिग बॉस शो'मध्ये प्रवेश केला आहे. यावेळी कॅन्सरची रुग्ण असलेल्या हिनाला 'तू 1000 टक्के बरी होशील', असा दिलासा सलमाननं दिला आहे.
By ETV Bharat Entertainment Team
Published : Nov 23, 2024, 4:56 PM IST
हिना खानच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली- 'बिग बॉस 18' च्या प्रोमोमध्ये आपण पाहतो की, सलमान खान हिना खानला एन्ट्री गेण्यासाठी साद घालतो. यावेळी तो तिला खरी फायटर असल्याचं म्हणतो. इतकंच नाही तर सलमाननं तिला मिठीत घेत तिचा मूड हलका करण्याचा प्रयत्नही केला. यावेळी हिना खान भावूक झाल्याचं दिसलं. तिनं आपल्या मनातील भावना सलमानसमोर व्यक्त केल्या. हिना खान म्हणाली की, मी बिग बॉस शोमधून बाहेर पडताना घेतलेली गोष्ट म्हणजे माझी ताकद आहे. मला या शोमध्ये खूप सुंदर टॅग मिळाला आहे, संपूर्ण जग मला शेर खान म्हणून ओळखते. यानंतर सलमान खान म्हणतो, ''तू नेहमीच फायटर राहिली आहेस आणि यावेळी तू प्रत्येक आव्हानाचा सामना करत आहेस, हिना, तू एक हजार टक्के पूर्णपणे ठीक होशील.'' सलमान खानचं हो बोलणं ऐकून हिना खानच्या डोळ्यात पाणी तरळले.
हिना खानने या वर्षी जूनमध्ये एका पोस्टमध्ये सांगितलं होतं की, तिला स्तनाचा कर्करोग झाल्याचे निदान झाले होते. यानंतर हिना खानच्या चाहत्यांना धक्काच बसला होता. हिना खाननं कॅन्सरच्या उपचारादरम्यान हॉस्पिटलमधील तिचे काही फोटो शेअर केले होते आणि चाहत्यांना प्रार्थना करण्याची विनंती केली होती. सध्या हिना खानची कॅन्सरशी लढाई सुरू आहे.