मुंबई Mamta Kulkarni : अभिनेत्री ममता कुलकर्णीला ड्रग्जशी संबंधित एका प्रकरणात मोठा दिलासा मिळाला आहे. पुराव्याअभावी मुंबई उच्च न्यायालयानं नुकताच ममताच्या विरुद्ध दाखल केलेला एफआयआर रद्द केला आहे. तिच्या याचिकेवर सुनावणी करत मुंबई उच्च न्यायालयाला ममता विरोधात कमी पुरावे असल्यानं ड्रग्ज प्रकरणातून तिची निर्दोष मुक्तता केली आहे. याआधी ममतानं याचिका दाखल करुन तिला ड्रग्ज घोटाळ्यात अडकवलं जात असल्याचं म्हटलं होतं. आता तिला मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे.
मुंबई उच्च न्यायालयानं ममता कुलकर्णीवरील ड्रग्जचा खटला फेटाळला, झाली निर्दोष मुक्तता - MAMTA KULKARNI - MAMTA KULKARNI
Mamta kulkarni : ममता कुलकर्णीची ड्रग्ज केस खटल्यात निर्दोष मुक्तता झाली आहे. पुराव्याअभावी मुंबई उच्च न्यायालयानं तिच्यावरचा खटला फेटाळला आहे.
Published : Jul 27, 2024, 11:22 AM IST
ममता कुलकर्णी निर्दोष : ममतावरील 2000 कोटी रुपयांचा ड्रग्ज तस्करीचा खटला हायकोर्टानं रद्द केला असून तिचा पती विकी गोस्वामीवर देखील ड्रग्ज, तस्करीचा आरोप होता. आता तिच्या विरोधात पुरेसे पुरावे नाहीत, या कारणास्तव हे प्रकरण समाप्त झालं आहे. न्यायमूर्ती भारती डांगरे आणि मंजुषा देशमुख यांच्या खंडपीठानं ममतावरील ड्रग्जचा खटला रद्द केला आहे. ममता कुलकर्णीनं पतीबरोबर केनियाला जाण्यापूर्वी 50 हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं होतं. 90च्या दशकात तिचं नाव टॉप अभिनेत्रीमध्ये होतं. तिचा पती विकी हा ड्रग्जच्या प्रकरणी अडकला होता. नार्कोटिक ड्रग्ज आणि सायकोट्रॉपिक सबस्टन्स अॅक्ट, 1985 अंतर्गत तो इफेड्रिनच्या निर्मिती आणि खरेदीमागील कथित सूत्रधार असल्याचं म्हणण्यात आलं होतं.
ममता कुलकर्णीच्या चित्रपटाबद्दल : यानंतर 2018मध्ये ममताच्या वकिलानं उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेत ममतावरील सर्व आरोप निराधार असून ती निर्दोष असल्याचं म्हणण्यात आलं होतं. अनेकदा ममतानं आपल्यावरचा खटला रद्द करण्याची मागणी केली. यानंतर 2016मध्ये ममता पुन्हा एकदा अंमली पदार्थांच्या तस्करीत अडकली होती. दरम्यान तिच्या बॉलिवूडमधील चित्रपटांबद्दल बोलायचं झालं तर तिनं राज कुमार आणि नाना पाटेकर स्टारर 1992मध्ये 'तिरंगा' चित्रपटातून पदार्पण केलं होतं. यानंतर तिनं 1990 च्या दशकात 'करण अर्जुन', 'वक्त हमारा है', 'क्रांतीवीर', 'सबसे बडा खिलाडी' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं. आता ममता ही रुपेरी पडद्यापासून दूर आहे.