महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

'बिग बॉस मराठी 5'मध्ये संग्राम चौगुले विरुद्ध निक्की तांबोळीची लढत, व्हिडिओ व्हायरल - BIGG BOSS MARATHI - BIGG BOSS MARATHI

Bigg Boss Marathi 5 : 'बिग बॉस मराठी 5'मध्ये वाइल्ड कार्ड स्पर्धक संग्राम चौगुलेची एन्ट्री झाल्यानंतर हा शो आणखीच मनोरंजक होताना दिसत आहे. निक्की तांबोळी आणि संग्राममध्ये पहिल्याच दिवशी वाद पाहायला मिळाला आहे.

Bigg Boss Marathi 5
बिग बॉस मराठी 5 (Instagram)

By ETV Bharat Entertainment Team

Published : Sep 10, 2024, 3:37 PM IST

मुंबई - Bigg Boss Marathi 5 :'बिग बॉस मराठी 5'च्या घरात आता वाइल्ड कार्ड स्पर्धक संग्राम चौगुलेची जोरदार एन्ट्री झाली आहे. त्याची घरात एन्ट्री झाल्यावर एक टास्क पार पडला आहे. या टास्कनंतर बिग बॉसच्या घरातील वातावरण चांगलंच पेटलं असल्याचं दिसलं. संग्राम चौगुलेला बिग बॉसनं न आवडलेल्या सदस्यांना विहिरीत ढकलण्याचा टास्क दिला होता. तो ज्या सदस्यांना विहिरीत ढकलणार त्यांना आठवडाभर बेड वापरता येणार नसल्याचं सांगण्यात आलं होतं. याशिवाय ते सदस्य जेवणात फक्त उकडलेले पदार्थ खाऊ शकतात असं देखील यात होत. याउलट ज्या सदस्यांना संग्राम विहिरीत ढकलणार नाही, ते सर्व सोयी-सुविधा वापरू शकेल असं देखील यावेळी सांगण्यात आलं होत.

निक्कीला विहिरीत ढकललं: जोडीमधील एका सदस्याला ढकलणं हे या टास्कमध्ये बंधनकारक होतं. पहिली जोडी पंढरीनाथ कांबळे आणि अरबाज पटेलची होती. यामध्ये संग्रामनं अरबाजला विहिरीत ढकललं. यानंतर वैभव चव्हाण आणि सूरज चव्हाणची जोडी होती. यात त्यानं वैभवला विहिरीत ढकललं. यानंतर जान्हवी किल्लेकर आणि आर्या जाधवची जोडी होती. यात त्यानं आर्या पाण्यात ढकललं. तसेच अंकिता वालावलकर आणि वर्षा उसगांवकर यांची जोडी होती. यात त्यानं अंकिताला विहिरीत ढकललं. यानंतर शेवटी निक्की तांबोळी, अभिजीत सावंत आणि धनंजय पोवार यांचं त्रिकुट होतं. यात त्याला दोन सदस्यांना पाण्यात ढकलणं बंधनकारक होतं. यामध्ये संग्रामनं निक्की आणि धनंजयला विहिरीत ढकललं.

संग्राम आणि निक्कीचा वाद : विहिरीत ढकलत असताना निक्की आणि संग्राममध्ये वाद झाले. यावेळी निक्कीनं वैद्यकीय कारण देत पाण्यात जाण्यास मनाई केली होती. यानंतर घरातील काही सदस्यांना वाटतं होतं की, निक्कीला पाण्यात ढकलायला पाहिजे. यावेळी घरातील सदस्य निक्कीला ढकल असल्याचं म्हणतात, यानंतर बिग बॉसनं मध्यस्थी करून निक्की पाण्यात जाऊ शकते , हे जाहीर केलं. यानंतर आणखी वाद होतात. संग्राम हा निक्कीला अचानक पाण्यात ढकलतो, यावर वादाची ठणगी पेटते. संग्रामनं विहिरी ढकलल्यामुळे निक्कीला राग येतो. ती संग्रामनं घेतलेल्या निर्णयाला विरोध करून म्हणते की, "तुला मी या घरात टिकू देणार नाही." यामध्ये अरबाज निक्कीच्या बाजूनं उभा होतो आणि संग्राम विरोधात बोलू लागतो. बिग बॉस निर्मात्यांनी आणखी एक प्रोमो रिलीज केला आहे. यामध्ये संग्राम आणि सूरज भांडी घासत असताना घरामधील खेळाबद्दल बोलताना दिसत आहेत.

हेही वाचा :

  1. 'बिग बॉस मराठी 5'मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री संग्राम चौगुलेनं घेतला निक्की आणि अरबाजबरोबर पंगा... - Sangram Chougule fight with nikki
  2. 'बिग बॉस मराठी 5'मध्ये भाऊच्या धक्क्यात रितेश देशमुख निक्की तांबोळीला देणार मोठी शिक्षा, प्रोमो व्हायरल - BIGG BOSS MARATHI
  3. बिग बॉस शोमधील नवीन कॅप्टन कोण असणार?, पाहा प्रोमो - बिग बॉस मराठी 5

ABOUT THE AUTHOR

...view details