मुंबई - Bajrangi Bhaijaan 2 : बॉलिवूड सुपरस्टार सलमान खाननं तीन वर्षांपूर्वी मुंबईतील 'आरआरआर' प्री-रिलीज इव्हेंटमध्ये त्याचा 2015 मधील हिट चित्रपट 'बजरंगी भाईजान'च्या अधिकृत सीक्वेलची घोषणा केली होती. सीक्वेलची कहाणी एसएस राजामौली यांचे वडील के.व्ही. विजेंद्र प्रसाद यांनी लिहिली होती. याशिवाय कबीर खाननं या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. आता पुन्हा एकदा 'बजरंगी भाईजान' बहुप्रतीक्षित सीक्वेलबद्दल चर्चा होताना दिसत आहे. अलीकडेच कबीर खाननं 'बजरंगी भाईजान'च्या सीक्वेलच्या त्याच्या प्लॅनबद्दल उघडपणं सांगितलं आहे.
'बजरंगी भाईजान' चित्रपटाचा सीक्वेल चर्चेत : एका मुलाखतीत कबीर खान म्हटलं की, "बजरंगी हे खरोखरच एक आयकॉनिक पात्र आहे. ही व्यक्तिरेखा सर्वांनाचं मोठ्या पडद्यावर पुन्हा पाहायची आहे, अनेकदा प्रेक्षकांकडून ऐकायला मिळते की, 'बजरंगी भाईजान' दुसरा भाग कधी येईल. कबीर खान पुढं सांगितलं, "पहिला चित्रपट मुन्नीभोवती फिरत असल्यानं, पात्राची कहाणी समाप्त झाली होती." या चित्रपटाच्या निर्मात्यानं सांगितलं की, "कहाणी पुढे नेण्याचं अनेक मनोरंजक मार्ग आहेत. बजरंगीला पुढे नेण्याचे अनेक मनोरंजक मार्ग आहेत. या चित्रपटाची स्क्रिप्ट अद्याप तयार नाही, परंतु माझ्याकडे काम करण्यासाठी काही मनोरंजक कल्पना आहेत."