मुंबई - Bade Miyan Chhote Miyan : बॉलिवूडचे दोन अॅक्शन हिरो अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांची जोडी अॅक्शन चित्रपट 'बडे मियाँ छोटे मियाँ' एकत्र दिसणार आहे. या चित्रपटाचे अनेक पोस्टर्स रिलीज झाले आहेत. हा चित्रपट पाहण्यासाठी अनेकजण उत्सुक आहेत. अक्षय आणि टायगर या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करताना दिसतायत.'बडे मियाँ छोटे मियाँ'मध्ये या जोडीचे जबरदस्त स्टंट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. या चित्रपटात अक्षय आणि टायगरशिवाय पृथ्वीराज सुकुमारन, मानुषी छिल्लर, आलिया इब्राहिम, सोनाक्षी सिन्हा, जान्हवी कपूर, जुगल हंसराज, रोनित रॉय आणि इतर कलाकार दिसणार आहेत.
'बडे मियाँ छोटे मियाँ' टीझर कधी होणार रिलीज : 'बडे मियाँ छोटे मियाँ' हा चित्रपट 10 एप्रिल, 2024 रोजी रुपेरी पडद्यावर रिलीज होणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन अली अब्बास जफर यांनी केलं आहे. दरम्यान 'बडे मियाँ छोटे मियाँ'मधील एक पोस्टर रिलीज करत या चित्रपटाचा टीझर कधी रिलीज होणार हे सांगण्यात आलं आहे. 'बडे मियाँ छोटे मियाँ'चा टीझर उद्या म्हणजेच 24 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता प्रदर्शित होणार आहे. अक्षय-टायगरच्या चाहत्यांना एक विशेष भेट उद्या मिळणार आहे. या चित्रपटाचं पोस्टर शेअर करत अक्षयनं लिहिलं, ''जेव्हा जगाला वाचवण्याची वेळ येते, तेव्हा तुझ्या मागे तुझा मित्र हा उभा असतो!'' या पोस्टवर आता अनेकजण कमेंट्स करून या जोडीवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहेत.