मुंबई - Bade Miyan Chote Miyan: 'बडे मियाँ छोटे मियाँ' चित्रपटातील एका मशिदीत बॉम्बस्फोटाच्या दृश्याविषयी पसरलेल्या अफवांदरम्यान, चित्रपटाच्या निर्मात्यांनी या खोट्या दाव्यांचे खंडन केलं आहे. यानंतर सीनबाबत निर्मात्यांनी एक निवेदनही जारी केलंय. 'बडे मियाँ छोटे मियाँ'च्या निर्मात्यांनी एका निवेदनाद्वारे इंटरनेटवर पसरवलेले गैरसमज दूर केला आहे. या निवेदनात म्हटले आहे की, "इंटरनेटवर असे काही व्हिडिओ आहेत जे आमच्या 'बडे मियाँ छोटे मियाँ' चित्रपटात मशिदीमध्ये बॉम्बस्फोट झाल्याचा खोटा दावा करत आहेत. निर्माते म्हणून, आम्ही हे सांगू इच्छितो की आम्ही सर्व सांस्कृतिक आणि धार्मिक गोष्टीचा आदर करतो आमच्या चित्रपटात बॉम्बस्फोट आहे. या दृश्यात कोणतेही धार्मिकस्थळ किंवा मशिदी नाही.''
'बडे मियाँ छोटे मियाँ' स्टार कास्ट : निर्मात्यांनी प्रेक्षकांना या निराधार आरोपांकडे दुर्लक्ष करण्याचे आवाहन केले आहे. या चित्रपटाचा एकमेव उद्देश प्रेक्षकांचे मनोरंजन करणे हा आहे. या स्पष्टीकरणाचा उद्देश कोणताही गैरसमज दूर करणे आहे. प्रेक्षकांना कोणतीही चिंता न करता या चित्रपटाचा तुम्ही आनंद घेऊ शकता." बडे मियाँ छोटे मियाँ' एक ॲक्शन-एंटरटेनर चित्रपट आहे. अली अब्बास जफर दिग्दर्शित या चित्रपटात अक्षय आणि टायगरशिवाय सोनाक्षी सिन्हा, मानुषी छिल्लर आणि आलिया इब्राहिम या अभिनेत्री प्रमुख भूमिकेत आहेत. याशिवाय या चित्रपटामध्ये साऊथ अभिनेता पृथ्वीराज सुकुमारननं खलनायकाची भूमिका साकारली आहे.