मुंबई - वरुण धवन, कीर्ती सुरेश आणि वामिका गब्बी यांच्या भूमिका असलेला 'बेबी जॉन' हा अॅक्शन ड्रामा चित्रपट ख्रिसमसच्या खास मुहूर्तावर प्रदर्शित झाला. आज 28 डिसेंबर रोजी 'बेबी जॉन'नं रिलीजच्या चौथ्या दिवसात प्रवेश केला आहे. सुट्टीच्या दिवशी प्रदर्शित झालेल्या 'बेबी जॉन' या चित्रपटानं पहिल्या दिवशी 11.25 कोटींचं खातं उघडले होतं. त्यानंतर बेबी जॉनच्या कमाईत दिवसेंदिवस सातत्याने घसरण होत आहे. 'बेबी जॉन' अल्लू अर्जुन स्टारर 'पुष्पा 2' या ऍक्शन ड्रामा फिल्मसमोर टिकाव धरू शकला नाही. बॉक्स ऑफिसवर 23 दिवस पूर्ण करूनही 'पुष्पा 2' चित्रपट 'बेबी जॉन'पेक्षाही अधिक कमाई करत आहे.
'बेबी जॉन'ची तिसऱ्या दिवसाची कमाई
सकनिल्कच्या मतानुसार, वरुण धवनच्या 'बेबी जॉन' या चित्रपटानं दुसऱ्या दिवशी 4.75 कोटी रुपये आणि तिसऱ्या दिवशी 3.65 कोटी रुपये (अंदाजे) कमावले आहेत. भारतात बेबी जॉनची एकूण कमाई 19.65 कोटींवर पोहोचली आहे. 'बेबी जॉन' हा चित्रपट वरुण धवनचा आजवरचा सर्वात मोठा ओपनिंग चित्रपट ठरू शकतो असा अंदाज वर्तवला जात होता. वरुणनं त्याच्या आधीच्या रिलीज झालेल्या भेडियाचा ओपनिंग डेचं रेकॉर्ड मोडण्यात नक्कीच यश मिळविलं आहे. मात्र, 'बेबी जॉन' आता वरूण धवनच्या टॉप 5 मोठ्या ओपनिंग चित्रपटांमध्ये पाचव्या क्रमांकावर आला आहे.
वरुण धवनचे टॉप ओपनिंग सिनेमे
कलंक – (2019) – 21.60 कोटी
जुडवा-2-(2017)- रु. 16.10 कोटी