महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

आयुष्मान खुरानानं करीना कपूर स्टारर मेघना गुलजारचा चित्रपट नाकारला, आलं कारण समोर - Ayushmann and Meghna Gulzar - AYUSHMANN AND MEGHNA GULZAR

Ayushmann Khurrana: आयुष्मान खुराना आणि करीना कपूर पहिल्यांदाच सॅम बहादूर दिग्दर्शिका मेघना गुलजार यांच्या चित्रपटात स्क्रिन शेअर करणार होते. मात्र आता आयुष्मान या चित्रपटाचा भाग नसल्याचं समजत आहे. आता आयुष्माननं हा चित्रपट कशामुळे नाकाराला याबद्दल जाणून घेऊया...

Ayushmann Khurrana
आयुष्मान खुराना (करीना कपूर (IANS))

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 4, 2024, 2:12 PM IST

मुंबई - Ayushmann Khurrana : 'राझी' आणि 'सॅम बहादूर'सारख्या धमाकेदार चित्रपटांची दिग्दर्शिका मेघना गुलजार, हैदराबाद बलात्कार प्रकरणावर चित्रपट बनवणार असल्याचं समजत आहे. याचं वर्षी या चित्रपटाचं शूटिंग सुरू होणार होतं. दरम्यान, काही दिवसापूर्वी चित्रपटाच्या स्टार कास्टबद्दल माहिती समोर आली होती की, आयुष्मान खुराना आणि करीना कपूर यात मुख्य भूमिका साकारणार आहेत. आता आयुष्मान या चित्रपटाचा भाग असणार नाही. ही गोष्ट आयुष्मानच्या चाहत्यांसाठी थोडी निराशाजनक असू शकते, कारण तो पहिल्यांदाच करीना कपूरबरोबर स्क्रिन शेअर करणार होता.

'या' कारणामुळे आयुष्माननं चित्रपट नाकारला : रिपोर्ट्सनुसार, आयुष्मान खुराना 2024 आणि 2025 मध्ये खूप व्यग्र आहे, त्याच्याकडे कोणत्याही अतिरिक्त तारखा नाहीत. मेघना गुलजारचा चित्रपट, ज्याचं कथित नाव 'दायरा' आहे, यावर्षाच्या अखेरीस हा चित्रपट फ्लोरवर जाणार होता. या चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान आयुष्मानचा यूएस म्युझिक टूर येतो, तसेच, 'बॉर्डर 2' व्यतिरिक्त, त्याच्याकडे आणखी दोन सिनेमॅटिक प्रोजेक्ट्स आहेत. सध्या सर्व प्रोजेक्ट्सच्या तारखा या निश्चित आहे, मात्र या यादीत मेघनाचा चित्रपट नाही. आता मेघना गुलजार मुख्य भूमिकेसाठी दुसऱ्या कोणाला तरी भेटणार असल्याचं समजत आहे.

करीना आणि आयुष्मानचं वर्क फ्रंट : या दोघांच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, करिना अलीकडेच कॉमेडी-ड्रामा 'क्रू'मध्ये दिसली होती. यामध्ये तिच्याबरोबर तब्बू, क्रिती सेनॉन, दिलजीत दोसांझ आणि कपिल शर्मा हे कलाकार होते. राजेश ए कृष्णन दिग्दर्शित या चित्रपटाला समीक्षक आणि प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळालं आहे. तिचा आगामी चित्रपट म्हणजे दिग्दर्शक रोहित शेट्टीचा ॲक्शन ड्रामा 'सिंघम अगेन' आहे. यामध्ये ती अजय देवगण, दीपिका पदुकोण, टायगर श्रॉफ, अर्जुन कपूर, रणवीर सिंग आणि अक्षय कुमार यांच्याबरोबर स्क्रिन शेअर करणार आहे. दुसरीकडे आयुष्मान खुराना हा शेवटी 'ड्रीम गर्ल 2 'मध्ये दिसला होता. हा चित्रपट 2019 च्या सुपरहिट 'ड्रीम गर्ल'चा सीक्वेल आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन राज शांडिल्य यांनी केलंय. यामध्ये त्याच्याबरोबर अनन्या पांडे मुख्य भूमिकेत दिसली होती. सध्या त्याच्याकडे करण जोहरचा 'व्हॅम्पायर्स ऑफ विजयनगर' हा चित्रपट आहे.

हेही वाचा :

  1. 'ड्रीम गर्ल'नंतर आयुष्मान खुराना पुन्हा एकदा राज शांडिल्यबरोबर करणार कॉमेडी, आगामी चित्रपटासाठी सज्ज - Ayushmann Khurrana upcoming movie
  2. करण जोहरच्या आगामी चित्रपटात आयुष्मान आणि साराची जोडी पहिल्यांदाच पडद्यावर दिसणार - AYUSHMANN AND SARA ALI KHAN
  3. आयुष्मान खुराना आणि रश्मिका मंदान्ना 'व्हॅम्पायर्स ऑफ विजयनगर'साठी येणार एकत्र - VAMPIRES OF VIJAY NAGAR

ABOUT THE AUTHOR

...view details