महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

'ड्रीम गर्ल'नंतर आयुष्मान खुराना पुन्हा एकदा राज शांडिल्यबरोबर करणार कॉमेडी, आगामी चित्रपटासाठी सज्ज - Ayushmann Khurrana upcoming movie - AYUSHMANN KHURRANA UPCOMING MOVIE

Ayushmann Khurrana: बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराना आणि चित्रपट दिग्दर्शक राज शांडिल्य यांनी ड्रीम गर्ल आणि ड्रीम गर्ल 2 मध्ये एकत्र काम केलं आहे. दोन्ही चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडले होते. आता पुन्हा ही जोडी नवीन चित्रपटासाठी सज्ज झाली आहे.

Ayushmann Khurrana
आयुष्मान खुराना (आयुष्मान खुराना (IANS))

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 20, 2024, 5:43 PM IST

मुंबई - Ayushmann Khurrana : बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराना स्टारर 'ड्रीम गर्ल' आणि 'ड्रीम गर्ल 2' प्रेक्षकांना खूप पसंत पडला होता. दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. 'ड्रीम गर्ल' आणि 'ड्रीम गर्ल 2' चं दिग्दर्शन आणि लेखन राज शांडिल्य यांनी केलय. आता राज आणि आयुष्मान आणखी एका कॉमेडी चित्रपटासाठी एकत्र येण्यास तयार आहेत. रिपोर्ट्सनुसार, आता त्यांच्यात बोलणी सुरू आहेत आणि जर सर्व काही ठीक झालं तर ते लवकरच या आगामी चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करु शकतात. याबाबत अजून अधिकृत दुजोरा मात्र मिळालेला नाही.

आयुष्मान खुराना आणि दिग्दर्शक राज शांडिल्य पुन्हा एकत्र काम करणार :मिळालेल्या माहितीनुसार राज शांडिल्य यांनी एक मजेदार कौटुंबिक कॉमेडी स्क्रिप्ट लिहिली आहे. आयुष्माननं या चित्रपटात काम करण्याची इच्छा त्यांनी दर्शवली आहे. आयुष्मानला चित्रपटाची मूळ कल्पना आवडली आहे. चित्रपटाची स्क्रिप्ट महिनाभरात पूर्ण झाली आहे. आता काही दिवसानंतर या चित्रपटाबद्दल एक घोषणा होईल. सध्या राज हे 'विक्की विद्या का वो वाला व्हिडिओ' या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. आयुष्मान हा करण जोहर आणि गुनीत मोंगाच्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये आहे. यानंतर तो ऑक्टोबरमध्ये दिनेश विजनसाठी 'व्हॅम्पायर्स ऑफ विजय नगर'चे शूटिंग करणार आहे.

'ड्रीम गर्ल'चा सीक्वेल :आयुष्मान खुराना शेवटी चित्रपट 'ड्रीम गर्ल 2' या चित्रपटामध्ये दिसला होता. हा चित्रपट 2019 च्या सुपरहिट 'ड्रीम गर्ल'चा सीक्वेल आहे. याचं दिग्दर्शन राज शांडिल्य यांनी केलं होतं. आयुष्मान खुरानानं यात दुहेरी भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटात त्याच्याबरोबर अभिनेत्री अनन्या पांडे, अन्नू कपूर, परेश रावल, मनजोत सिंह, राजपाल यादव आणि इतर कलाकार दिसले. बालाजी मोशन पिक्चर्सच्या बॅनरखाली एकता कपूर आणि शोभा कपूर यांनी त्याची निर्मिती केली होती. हा चित्रपट 25 ऑगस्ट 2023 रोजी रुपेरी पडद्यावर प्रदर्शित झाला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details