महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

जेम्स कॅमेरॉनच्या 'अवतार 3'चं शीर्षक आणि तारीख जाहीर - James Kamroon - JAMES KAMROON

Avatar Fire And Ash: जेम्स कॅमेरॉनच्या 'अवतार' या ब्लॉकबस्टर चित्रपटाच्या तिसऱ्या भागाचे शीर्षक जाहीर करण्यात आलंय. याशिवाय या चित्रपटाची रिलीज डेटही समोर आली आहे.

Avatar Fire And Ash
अवतार: फायर अँड ॲश ((Film Poster( Disney-Instagram)))

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 10, 2024, 2:04 PM IST

मुंबई -Avatar Fire And Ash :'अवतार' या ब्लॉकबस्टर चित्रपटाच्या बहुप्रतीक्षित तिसऱ्या भागाची प्रेक्षक आतुरतेनं वाट पाहत आहेत. नुकतेच निर्मात्यांनी नवीन पोस्टर रिलीज करून या चित्रपटाच्या शीर्षकाचे अनावरण करत रिलीज तारीख देखील जाहीर केली आहे. 'अवतार'चा मागील भाग 'अवतार: द वे ऑफ वॉटर' होता. हा चित्रपट 16 डिसेंबर 2022 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. 'अवतार 3'चं दिग्दर्शन जेम्स कॅमेरॉन करणार आहे. फ्रेंचायझीचा तिसरा भाग हा कधी रिलीज होणार आहे, याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत .

'अवतार' फ्रँचायझीचा तिसरा भाग कधी होईल रिलीज : 'अवतार' फ्रँचायझीच्या तिसऱ्या भागाचं शीर्षक 'अवतार: फायर अँन्ड ॲश' असं आहे. 'अवतार: फायर अँन्ड ॲश'चं अधिकृत पोस्टर रिलीज करत, निर्मात्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं, "आम्ही पुढील 'अवतार' चित्रपटाचं शीर्षक जाहीर केलं आहे 'अवतार: फायर अँड ॲश' 19 डिसेंबर 2025 रोजी थिएटरमध्ये, पेंडोरा प्रवासासाठी तयार होणार आहे." या चित्रपटामध्ये अ‍ॅनिमेशन प्रेक्षकांना खूप पाहायला मिळणार आहे. दरम्यान अवतार' फ्रेंचायझीचे दोन्ही पार्ट हे बॉक्स ऑफिसवर हिट ठरले होते. हा चित्रपट मोठ्या आणि छोट्या मुलांना देखील खूप आवडतो. आता यावेळी या चित्रपटामध्ये प्रेक्षकांना खूप काही नवीन पाहायला मिळणार आहे.

प्रेक्षकांना मिळेल व्हिज्युअल ट्रीट : जेम्स यांनी चित्रपटातील कोणतेही व्हिडिओ फुटेज दिला नसला तरी, त्यांनी चित्रपटातील काही संकल्पना कला दाखवल्या आहेत. यामध्ये नेतिरी (सलदाना) ज्वालांवर नाचणे आणि बंशीवर सवारी करणे, या गोष्टीचा समावेश आहे. जेम्स कॅमेरॉन या चित्रपटाबद्दल म्हटलं, "हा खूपच रोमांचक आणि वेगळा अनुभव आहे आणि डोळ्यांसाठी ही एक व्हिज्युअल ट्रीट देखील असेल. 'अवतार-द वे ऑफ वॉटर' जिथे संपला तिथून चित्रपट सुरू होईल." या चित्रपटात नवीन पात्रं दिसणार असल्याचं त्यांनी सांगितलं. वर्थिंग्टन आणि सलदाना व्यतिरिक्त या चित्रपटात सिगोरनी वीवर, स्टीफन लैंग, ब्रिटेन डाल्टन, जॅक चॅम्पियन, ट्रिनिटी जो-ली ब्लिस, बेली बास, केट विंसलेट, क्लिफ कर्टिस,जोएल डेविड मूर, एडी फाल्को आणि दिलीप राव देखील आहेत.

हेही वाचा :

  1. Avatar 2 World Record : अवतार 2 ने स्टार वॉर्सल टाकले मागे, ठरला जगातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट
  2. Avatar 2 enters the 2 billion club: अवतार: द वे ऑफ वॉटरने पार केला 2 अब्ज डॉलर्सचा टप्पा, रचला नवा इतिहास
  3. 'अवतार 2'ची बॉक्स ऑफिसवर धुँवाधार कमाई, ३ दिवसांत जमवला १६० कोटींचा गल्ला

ABOUT THE AUTHOR

...view details