मुंबई - Bigg Boss OTT 3 : 'बिग बॉस ओटीटी 3'च्या घरात एक धक्कादायक घटना घडली आहे. युट्युबर अरमान मलिकनं विशाल पांडेला झापड मारल्यानंतर तो चर्चेत आला आहे. 'वीकेंड का वार' एपिसोडमध्ये, माजी स्पर्धक आणि अरमानची पहिली पत्नी पायल मलिकनं अचानक या शोमध्ये भेट दिली. अरमानची दुसरी पत्नी कृतिका मलिकवर केलेल्या कमेंटबद्दल तिनं विशालशी चर्चा केली. यापूर्वी एका एपिसोडमध्ये विशालनं लवकेश कटारियाला सांगितलं होतं की, "मला कृतिका भाभी खूप आवडते." नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये पायलनं विशालला सांगितलं की, "तू आई आणि पत्नीबद्दल बोलत आहेस. तू त्यांचा आदर करायला हवा. तू कृतिकाबद्दल जे बोललास ते चुकीचे आहे." पायल आणि अरमानसह शोचे होस्ट अनिल कपूर यांनीदेखील विशालला फटकारलं.
विशालनं स्वतःचा केला बचाव :अनिलनं लवकेश कटारियाला विचारलं असता, यावर विशालनं सांगितलं की, "मला कृतिका भाभी खूप आवडते, याचा अर्थ चुकीचा घेतला गेला आहे." यावर पायल म्हटलं की, "जर तू 'दोषी' नव्हता तर त्यानं थेट कृतिकाला सांगण्याऐवजी लवकेशच्या कानात ही कुजबुज का केली?" पायल गेल्यानंतर अरमान विशालशी या प्रकरणाबद्दल बोलायला गेला. यावर दोघांमध्ये बाचाबाची झाली. अरमानचा संयम सुटला. त्यानं विशालला झापड मारली. त्यानंतर तो आरडाओरडा करताना दिसला. विशाल आणि अरमान दोघेही एकमेकांना मारण्याचा प्रयत्न करताना दिसले. इतर स्पर्धक त्यांना एकमेकांपासून दूर ढकलत होते.