मुंबई - Arjun Rampal : बॉलिवूड स्टार अर्जुन कपूरनं भारतीय चित्रपटसृष्टीत इतिहास रचला आहे. अर्जुन रामपालनं चाइल्ड रिलीफ अॅन्ड यू (CRY) अमेरिकेसाठी 1.5 डॉलर दशलक्ष जमा केले असून तो इतकी मदत करणारा पहिला भारतीय स्टार बनला आहे. अर्जुन रामपालनं बाल हक्कांसाठी हे महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. अर्जुन आणि एनजीओ 'चाइल्ड रिलीफ अॅन्ड यू' (CRY) अमेरिका यांनी मिळून बालकांच्या हेल्दी आणि एजुकेशन लाइफ सुधारण्यासाठी पुढाकार घेतला आहे. अर्जुन रामपालसाठी 'चाइल्ड रिलीफ अॅन्ड यू' अमेरिकाच्या अध्यक्षा शेफाली सुंदरलाल यांनी म्हटलं, "एप्रिल 2024 मध्ये युनायटेड स्टेट्समध्ये आमच्या 5 सीआरवाय गाला कार्यक्रमांसाठी सेलिब्रिटी पाहुणे म्हणून अर्जुन रामपाल आले याबद्दल आम्ही खूप आभारी आहोत. त्याच्या जिद्द आणि करिश्मामुळे मुलांच्या हक्कांसाठी लढण्यास मदत झाली आहे. मुलांसाठीचे आमचे ध्येय पुढे नेण्यासाठी अर्जुनचे आम्ही मनापासून कौतुक करतो. या मदतीचा खूप फायदा होणार आहे."
अर्जुन रामपाल केली 'चाइल्ड रिलीफ अॅन्ड यू' एनजीओला मदत: यानंतर अर्जुन रामपालनं म्हटलं, "गेल्या 20 वर्षांपासून फाउंडेशनशी संबंधित सर्व समर्थकांचं मी आभार मानतो, 'चाइल्ड रिलीफ अॅन्ड यू' अमेरिकेनं अंदाजे 800,000 वंचित मुलांना जीवन दिलं आहे. यानंतर प्रोजेक्ट पार्टनर डॉ. रोली सिंग यांनी म्हटलं, अर्जुननं या मोहिमेचे नेतृत्व करण्यासाठी 'चाइल्ड रिलीफ अॅन्ड यू' अमेरिकाला केलेलं समर्पण हे बदलाचे प्रतीक बनले आहे, त्यानं अनेक लोकांना या मोहिमेमध्ये सामील होण्यास प्रवृत्त केलं आहे. त्याच्या आवाहननं आणि यावरील अतूट विश्वासामुळे लोकांचे लक्ष वेधून घेतलं होतं." आता ही बातमी समोर आल्यानंतर अर्जुनचे चाहते आणि काही सेलिब्रिटी त्याचे सोशल मीडियाद्वारे कौतुक करत आहेत.