मुंबई - Annu Kapoor Kangana and Ranaut :'हम दो हमारे बारह' चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान अन्नू कपूरनं एक कमेंट केली. या व्हिडिओमध्ये त्यांनी वादग्रस्त विधान केलं होतं. काही दिवसापूर्वी कंगना राणौतला सीआयएसएफ (CISF) महिला कर्मचाऱ्यांनी कानशीलात मारली होती. याप्रकरणी कंगना राणौतनं आपली प्रतिकिया दिली होती. अन्नू कपूरनं कंगनाबरोबर झालेल्या प्रकरणी वादग्रस्त कमेंट केल्यानंतर हे प्रकरण चिघळलं होतं. यानंतर अन्नू कपूरनं या प्रतिक्रियेनंतर माफी मागितली आहे. त्यांनी थेट सोशल मीडिया अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं, "माझ्यासाठी प्रत्येक स्त्री आदरणीय आहे, म्हणूनच मी कधीही कोणत्याही महिलेचा अनादर करू शकत नाही."
अन्नू कपूर कपूरनं मागितली माफी :कंगना रणौतबरोबर झालेल्या याप्रकरणी कपूर यांनी ही माफी मागितली आहे. 'हमारे बारह' या चित्रपटासाठी पत्रकार परिषदेत अन्नू कपूरनं सुरुवातीला कंगना राणौतची ओळख नसल्यानं विधान केल्यानं हा वाद सुरू झाला होता. यावेळी त्यांनी म्हटलं होतं, "कोण आहे ही कंगना जी?' कृपया मला सांगा, ती कोण आहे ? साहजिकच तुम्ही विचारताय, म्हणजे कुणीतरी मोठी नायिका असावी?" नंतर पत्रकार परिषदेत अन्नू कपूर यांनी समाजातील यशस्वी महिलांबद्दलच्या धारणांवर भाष्य केलं होतं. कंगनानं अन्नू कपूरच्या पत्रकार परिषदेची एक क्लिप तिच्या इंस्टाग्राम स्टोरीजद्वारे शेअर केली होती.