मुंबई - Ankita lokhande : अभिनेता रणदीप हुड्डा आणि अभिनेत्री अंकिता लोखंडे स्टारर 'स्वातंत्र्य वीर सावरकर' हा चित्रपट बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. 'स्वातंत्र्य वीर सावरकर' या चित्रपटामध्ये अंकिता रणदीपच्या पत्नीच्या भूमिकेत दिसत आहे. नुकतेच 'स्वातंत्र्य वीर सावरकर' या चित्रपटाचे स्पेशल स्क्रिनिंग आयोजित करण्यात आले होतं. आता सोशल मीडियावर या स्क्रीनिंगचे काही व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत अंकिताची सासू आपल्या सुनेबद्दल बोलताना दिसत आहे. 'स्वातंत्र्य वीर सावरकर' चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगला अंकिता लोखंडेचा पती विकी जैन आणि तिचे सासू-सासऱ्यांसह काही मैत्रमंडळी उपस्थित होते.
अंकिता लोखंडेच्या सासूचा व्हिडिओ व्हायरल :अंकिताची सासू रंजना जैन आणि पती विकी व्यतिरिक्त, बिग बॉसमधील काही स्पर्धक अभिषेक कुमार, ईशा मालवीय, आयशा खान, समर्थ जुरेल आणि खानजादी यांनी देखील या स्पेशल स्क्रिनिंगला हजेरी लावली होती. आता सूनेचा हा चित्रपट प्रदर्शित होताच सासूचा दृष्टिकोन बदलताना दिसला आहे. एक व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये अंकिताची सासू तिचे कौतुक करताना दिसत आहे. अंकिताच्या सासूचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकजण आश्चर्यचकित झाले आहेत. पापाराझीनं अंकिताच्या सासूला तिच्या 'वीर सावरकर' चित्रपटाचा रिव्ह्यू विचारला तेव्हा तिनं सांगितलं, 'अंकिता नेहमीच छान दिसते, हो मला अशी सून हवी होती आणि मला अशीच सून भेटली.'' बिग बॉस 17मध्ये असताना अंकिताबद्दल तिची सासू वाईट बोलले होती आणि याशिवाय तिने मीडियामध्ये येऊन तिच्यावर चिखल फेक देखील केली होती. आता रंजना जैन यांचं विधान ऐकल्यानंतर अनेकजण तिला सोशल मीडियावर ट्रोल करत आहेत.