मुंबई- Ananya What If : मराठी चित्रपटसृष्टीत सातत्यानं नवे प्रयोग होत आले आहेत. आपल्याकडे उपलब्ध असलेल्या साधनसामुग्रीचा यथायोग्य उपयोग करुन उत्तम कलाकृती बनवण्याची कला खूप कमी लोकांना अवगत असते. चित्रपट बनवण्याचं स्वप्न पाहणाऱ्या सृजनशील दिग्दर्शक शिवाजी कचरे यांनी एक संवेदनशील विषयावरच्या चित्रपटाला न्याय देण्यासाठी सर्वस्व पणाला लावून पूर्ण लांबीचा चित्रपट बनवला. थिएटरमध्ये मराठी चित्रपटाला स्क्रिन्स मिळत नाहीत, ओटीटी प्लॅटफॉर्मही पुरेशी दखल घेत नाहीत, मग आपली कलाकृती जास्तीत जास्त लोकांपर्यत पोहोचवण्यासाठी काही मित्रांनी एकत्र येऊन डिजीटल फिल्म मेकर्स ही आपली निर्मिती संस्था स्थापन केली. आपली कथा तयार केली, आपल्यातलेच कलाकार निवडले, त्यांना प्रशिक्षित केलं, तंत्र समजून घेतलं आणि "अनन्या व्हॉट इफ" हा थ्रिलर मराठी बनवला आणि थेट यूट्यूबवर प्रदर्शित केला आहे.
काय आहे "अनन्या व्हॉट इफ"ची कथा?
हा चित्रपट किशोरवयीन मुलींच्या जीवनातील मैत्री, विश्वासघात आणि सोशल मीडियाच्या युगातील त्यांच्या समोर असणाऱ्या आव्हानांवर आधारित आहे. किशोरवयीन मुलांच्या जीवनातील समस्या, त्यांचा संघर्ष, आणि FOMO (फियर ऑफ मिसिंग आउट) यांचा प्रभाव या विषयावर हा चित्रपट थेट प्रकाश टाकतो.
यामध्ये अनन्या, तनू, आणि रिचा या तीन किशोरवयीन मुलींची कथा आहे. अनन्या आणि तनू या लहानपणापासूनच्या घनिष्ठ मैत्रिणी आहेत. त्यांची मैत्री अतूट आहे, पण त्यांच्या वर्गात रिचा ही मुलगी आल्यापासून त्यांच्या मैत्रीत दुरावा तयार होतो. अनेक नाट्यमय घडामोडी पडद्यावर घडत असताना खुर्टीला खिळवून ठेवणारा नाट्य अनुभव हा चित्रपट देतो. सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होते आणि या तीनही मुलींच्या आयुष्यात काय घडतं याचा थरारक अनुभव चित्रपट पाहिल्यावर मिळतो.
किशोरवयीन मुलांच्या मानसिकतेचा खोलवर मांडलेले प्रसंग, सोशल मीडियाच्या प्रभावाचा परिणाम आणि त्यांच्या जीवनातील आव्हानं यांचा उत्तम मेळ चित्रपटात घालण्यात आला आहे. अनन्या, तनू आणि रिचाच्या भूमिका त्याचं वयातील किशोरवयीन अभिनेत्रींच्या उत्कृष्ट अभिनयामुळे कथा अधिक जीवंत आणि रंजक झाली आहे. कथानकात येणारे वळणं आणि संघर्ष, प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवतात.
"अनन्या व्हॉट इफ"ची स्टार कास्ट