मुंबई - Justin Bieber in Mumbai : अनंत अंबानी-राधिका मर्चंटचं लग्न सध्या खूप चर्चेत आहे. या जोडप्याच्या लग्नसोहळ्याला आणखी विशेष बनवण्यासाठी आंतरराष्ट्रीय पॉप आयकॉन जस्टिन बीबर मुंबईत आला आहे. आज 4 जुलै रोजी जस्टिन झलक मुंबईत पाहायला मिळाली आहे. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या संगीत सोहळ्यात जस्टिन बीबर परफॉर्म करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. पापाराझीनं त्याच्या इंस्टाग्रामवर जस्टिन बीबरचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. व्हिडिओमध्ये जस्टिन बीबरची कार अंबानींच्या निवासस्थानाकडे जाताना दिसत आहे. त्याच्या गाडीच्या पुढे आणि मागे काही पोलिसांची वाहने देखील दिसत आहेत.
जस्टिन बीबर अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नात करणार धमाल :गेल्या काही दिवसांपासून जस्टिन बीबरनं तब्येतीच्या समस्येमुळे त्याचा कॉन्सर्ट रद्द केल्याच्या चर्चा होत्या. जस्टिन मुंबईतील अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या संगीत समारंभात परफॉर्म करून पाहुण्यांना खूश करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जस्टिन बीबर व्यतिरिक्त रॅपर बादशाह आणि पंजाबी गायक करण औजला देखील संगीत सेरेमनीमध्ये परफॉर्म करणार आहेत. याआधी या लग्नात ॲडेल, ड्रेक आणि लाना डेल रे यांच्या परफॉर्म होणार असल्याच्या चर्चा होत्या. तसेच या लग्नामध्ये अनेक नामवंत व्यक्ती उपस्थित राहणार आहेत. काही दिवसापूर्वी अनंत अंबानीनं स्वत: बॉलिवूड सेलिब्रिटींना लग्नामध्ये आमंत्रित करण्यासाठी गेला होता. यानंतर तो काही धार्मिकस्थळी देखील गेला होता. सध्या अंबानी कुटुंब हे लग्नाची जोरदार तयार करताना दिसत आहेत.