महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

"जायची वेळ झाली", असं का म्हणाले अमिताभ बच्चन, जाणून घ्या पोस्ट मागचं सत्य - AMITABH BACHCHAN LATEST POST

अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर केलेल्या लेटेस्ट पोस्टमुळं चाहत्यांचा गोंधळ उडाला आहे. बिग बींच्या पोस्टचं सत्य येथे जाणून घ्या.

Amitabh Bachchan
अमिताभ बच्चन ((ANI))

By ETV Bharat Entertainment Team

Published : Feb 8, 2025, 4:57 PM IST

मुंबई - मेगास्टार अमिताभ बच्चन पोस्टच्या माध्यमातून नेहमी आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असतात. ते दररोज सोशल मीडियावर पोस्ट करतात आणि प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतात. बिग बी दर रविवारी त्यांच्या चाहत्यांना भेटण्यासाठी आणि त्यांना अभिवादन करण्यासाठी घराबाहेर पडतात. अनेक वर्षापासून त्यांचा हा सिलसिला सुरू आहे. दरम्यान, ८२ वर्षांचे होत असलेल्या अमिताभ बच्चन यांनी आता अशी एक पोस्ट केली आहे ज्यामुळे त्यांचे चाहते चिंतेत पडले आहेत. अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या एक्स हँडलवर ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टनं अमिताभच्या चाहत्यांना विचार करायला भाग पाडलं आहे. बिग बींनी रात्री हे पोस्ट केल्यामुळं चाहत्यांच्या चिंतेत आणखी भर पडली होती.

बिग बींची लेटेस्ट पोस्ट 'जाण्याची वेळ झाली आहे' - अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या एक्स हँडलवर लिहिले आहे की, 'जाण्याची वेळ झाली आहे'. बिग बी यांनी ही पोस्ट रात्री ८.३० वाजता लिहिली आहे. त्यामुळं नेमकं काय घडलं हे चाहते जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. ही पोस्ट पाहिल्यानंतर बिग बींच्या पोस्टच्या कमेंट बॉक्समध्ये चाहत्यांच्या कमेंट्सचा वर्षाव झाला आहे. यावर एका चाहत्याने विचारले आहे की, सर, तुम्ही काय लिहित आहात? प्लिज, त्याचा अर्थ देखील सांगा. या पोस्टवर अनेक युजर्सनी लिहिलंय की, अमिताभ सर शूटिंग संपवून घरी जाण्याबद्दल बोलत आहेत. बिग बींच्या या पोस्टमुळं चाहत्यांचा गैरसमज होताना दिसत आहे.

सध्या अमिताभ बच्चन त्यांच्या कौन बनेगा करोडपतीच्या सीझन १६ चे होस्टिंग करत आहेत. या कार्यक्रमाचं शूटिंग संपवून घरी जाण्यापूर्वी अमिताभ यांनी ही वरील पोस्ट केल्याचं काही जणांना वाटतंय. कामाच्या आघाडीवर अमिताभ बच्चन अखेरचे रजनीकांत यांच्या 'वेट्टियान' चित्रपटात दिसले होते. सध्या त्यांच्याकडे 'रामायण' आणि 'आँखे २' हे चित्रपटही आहेत.

हेही वाचा -

ABOUT THE AUTHOR

...view details