मुंबई - आजच्या आघाडीच्या नवोदित डान्सरमध्ये अग्रणी असलेली माधुरी पवार आपल्या डान्स मुव्हजनी प्रेक्षकांना घायाळ करत आली आहे. तिच्यावर चित्रीत झालेल्या “मीच ट्रेंडिंग हाय” गाण्याला प्रेक्षकांचा ट्रेडिंग प्रतिसाद मिळत आहे. विशेष म्हणजे या गाण्याला वैशाली सामंत आणि आदर्श शिंदे यांनी स्वरसाज चढवला असल्यानं गाण्यातला श्रृंगार बहरला आहे. विजया आनंद म्यूझिकनं सादर केलेलं हे गाणं प्रेक्षकांची दाद मिळवत आहे.
माधुरी पवारनं आपल्या नृत्य कौशल्याच्या जोरावर 'झी युवा अप्सरा आली' हा किताब जिंकला होता. त्यानंतर तिचा अभिनयाचा प्रवासही उत्तम सुरु आहे. 'तुझ्यात जीव रंगला' मधील वाहिणीसाहेब आणि 'देवमाणूस' मधील चंदा या व्यक्तीरेखा तिनं साकारल्या आहेत. टीव्हीच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या घराघरात पोहोचलेली माधुरी आता नव्या गाण्यातून प्रेक्षकांना भुरळ घालत आहे.
वैशाली सामंत आणि आदर्श शिंदे यांच्या आवाजातील “मीच ट्रेंडिंग हाय” गाण्याला डॉ. उत्कर्ष शिंदे आणि आदर्श शिंदे यांनी संगीतबद्ध केलंय. विशेष म्हणजे या गाण्याचे बोलही त्यांनीच लिहिलेत. साऊंड प्रोड्यूसर प्रफुल्ल कार्लेकर यांच्यासह हे गाणं अवधूत वाडेकर यांनी रेकॉर्ड केलंय. अमेय लोंढे यांनी मिक्स आणि मास्टर केलेल्या या गाण्याचं संयोजन स्वप्नील पगारे यांनी केलंय. अपूर्व मोतीवाले यांनी संकलन केलेल्या या गाण्याचं ऑनलाईन संकलन अभिषेक मांजरेकरांनी केलंय. वैभवी घुगे आणि सुशिल पाटील यांनी या गाण्याची कोरिओग्राफी केली आहे.
“मीच ट्रेंडिंग हाय” गाणं विजय आनंद म्यूझिकच्या यूट्यूब चॅनेलवर रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांचा त्याला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. अनेकांनी गाणं पाहून सुंदर कमेंट्स केल्या आहेत. एका प्रेक्षकानं लिहिलंय की, "सुंदर जमलं हा..... आदर्श दादा चा आवाज म्हणजे भारीच. मी दादाचा वैशाली सामंत यांच्या आवाजात आजिवासन स्टूडिओत खूप चांगले गाणं रेकॉर्ड करून ठेवली आहेत... काही कारणांमुळे नाही करता आलं.....पण उत्कर्ष दादा आपण उगवता तारा आहात... आम्हाला खूप अपेक्षा आहेत आपणाकडून..."
"आदर्श आणि ऊत्कर्ष दादा, माधुरी मॅम , ऊत्कर्ष दादाचा अभिनय, डान्स, वैशाली ताईचा गोड आवज आणि माझ्या सुपरस्टार आदर्श दादुचा बुलंद आवाज सगळेच लयभारी आहे.खुप खुप शुभेच्छा.", असंही एकानं लिहिलंय. तर आणखी एका प्रेक्षकानं लिहिलंय, "सुपरहिट गाणं झालं दादा आपल्याला आवडलं माधुरी पवार आणि उत्कर्ष शिंदे यांचा नादच खुळा."
हेही वाचा -
रस्त्यावरील मुलगी बनली स्टार, जाणून घ्या कोण आहे 'ही' ऑस्करपर्यंत पोहोचलेली 'अनुजा'!!
"'छावा'मध्ये साहसी क्षण जगण्याची संधी मिळाली", विकी कौशलची विनम्र कबूली
"रंगभूमीवर परतताना प्रेक्षकांचा उत्साह बघून आनंद होतो" : निखिल चव्हाण