ETV Bharat / entertainment

फोटो मागील फोटोग्राफरची सायकॉलॉजिकल गोष्ट: 'छबी'! - MARATHI FILM CHABI

फोटोग्राफरची सायकॉलॉजिकल कहानी मोठ्या पडद्यावर सादर होणार आहे. दिग्दर्शक अद्वैत मसूरकर यांनी निर्माण केलेला 'छबी' हा चित्रपट येत्या २५ एप्रिलला प्रदर्शित होत आहे.

MARATHI FILM CHABI
छबी (MARATHI FILM CHABI poster)
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Feb 8, 2025, 1:10 PM IST

Updated : Feb 8, 2025, 1:16 PM IST

मुंबई - जेव्हापासून मोबाईलमध्ये कॅमेरा आला तेव्हापासून सर्वांना फोटो काढण्याची सवय लागली. त्यामुळे जवळपास सगळेच जण फोटोग्राफर झाले. परंतु फोटो काढणे ही शास्त्रशुद्ध कला आहे आणि चांगला फोटोग्राफरच उत्तम फोटो काढू शकतो ही गोष्ट कोणी नाकारू शकणार नाही. आता एका फोटोग्राफरच्या जगण्याची अनोखी कहाणी पडद्यावर उलगडणार आहे, 'छबी' या मराठी चित्रपटातून. कॅमेऱ्याच्या मागचं सायकॉलॉजिकल वास्तव आता समोर येणार असून ते मनोरंजकपणे ‘छबी’ या चित्रपटातून मांडण्यात आले आहे.

फोटो काढणे ही एक क्रिएटिव्ह गोष्ट असून प्रत्येक छायाचित्राच्या मागे एक कथा असते. पण तो फोटो काढणाऱ्या त्या छायाचित्रकाराच्या आयुष्यातील कथा फार कमी लोकांना माहित असते. अशाच प्रकारचे कथानक घेऊन दिग्दर्शक अद्वैत मसूरकर यांनी या चित्रपटातून एक वेगळा दृष्टिकोन मांडण्याचा प्रयत्न केला आहे. चित्रपटाचं लेखनही त्यांनीच केलं असून त्यांचे या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनीय पदार्पण होत आहे.

केके फिल्म्स क्रिएशन आणि उप्स डिजिटल एंटरटेन्मेंट प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती जया तलक्षी छेडा यांनी केली आहे. चित्रपटाची कथा कोकणातील एका छोट्या गावात घडते, जिथे एका फोटोग्राफरच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांची उत्कंठावर्धक मांडणी यात केली आहे. 'छबी' हे नाव साधं वाटतं, परंतु त्याच्या मागे दडलेलं नाट्य गुंतागुंतीचं आहे. या चित्रपटात समीर धर्माधिकारी आणि मकरंद देशपांडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. त्यांच्यासोबत शुभांगी गोखले, राजन भिसे, जयवंत वाडकर, संकेत मोरे, संजय कुलकर्णी, लीना पंडित, ध्रुव छेडा, सृष्टी बाहेकर, अनघा अतुल, रोहित लाड, ज्ञानेश कदम, अपूर्वा कवडे यांच्या भूमिका आहेत.

मराठी चित्रपटात नेहमीच वेगवेगळे विषय हाताळलेले पाहायला मिळतात. फोटोग्राफर्सच्या आयुष्यात घडणाऱ्या घटना आपल्यासाठी अनोख्या असू शकतात. छबीमधून मांडण्यात येणारा विषय रंजक असेल याची खात्री निर्मात्यांना यानिमित्तानं वाटत आहे. "प्रत्येक छबीत एक गोष्ट असते" ही टॅगलाईन असणारा 'छबी' हा चित्रपट येत्या २५ एप्रिलला चित्रपटगृहांत प्रदर्शित होत आहे.

Last Updated : Feb 8, 2025, 1:16 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.