मुंबई - T20 world cup : भारतानं 17 वर्षांनंतर टी 20 विश्वचषक 2024 जिंकून इतिहास रचला आहे. टीम इंडियानं फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेला 7 विकेट्सनं पराभूत करून ट्रॉफी जिंकली आहे. भारतानं दुसऱ्यांदा टी 20 विश्वचषक जिंकला आहे. यापूर्वी भारतीय संघानं 2007 मध्ये ट्रॉफी जिंकली होती. यावेळी महेंद्र सिंग धोनी संघाचा कॅप्टन होता. या ऐतिहासिक विजयानंतर संपूर्ण देशात आनंदाचं वातावरण आहे. प्रत्येकजण भारतीय संघाचा विजय साजरा करत आहे. या प्रसंगी बॉलिवूड सेलिब्रिटीही या विजयाचा आनंद साजरा करत आहेत. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून भारताच्या विजयाचा आनंद व्यक्त करत आहेत.
बॉलिवूड सेलिब्रिटींनी दिल्या शुभेच्छा :अनिल कपूरनं टीम इंडियाच्या विजयाबद्दल अभिनंदन करणारी पोस्ट शेअर करत लिहिलं, "सर्व भारतीय यावेळी आनंदाची भावना अनुभवत आहेत. असली चॅम्पियन्स." यानंतर या ऐतिहासिक विजयावर अमिताभ बच्चन यांनीही आनंद व्यक्त करत लिहिलं, "अश्रू वाहत आहेत...वर्ल्ड चॅम्पियन्स. जय हिंद." चॅम्पियन्स ट्रॉफीचा फोटो शेअर करताना सलमान खान पोस्टवर लिहिलं, "टीम इंडियाचे अभिनंदन!" तसेच कार्तिक आर्यन आपली खुशी व्यक्त करत लिहिलं, "टीम इंडियानं आत्मसमर्पण करण्यास नकार दिला. आजचा विश्वचषक नाही, पण कायमची मनं जिंकली, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय." अभिषेक बच्चननेही पोस्ट शेअर करून या शानदार विजयावर आनंद व्यक्त केला आहे.