हैदराबाद : तुमच्या फोनवर व्हॉट्सॲप, टेलिग्राम आणि इन्स्टाग्राम असल्यास तुम्हाला सावध राहण्याची गरज आहे. या ॲप्सच्या माध्यमातून सायबर ठग लोकांना सर्वाधिक टार्गेट करत असल्याचं गृह मंत्रालयाच्या अहवालातून समोर आलं आहे. वास्तविक, या तिन्ही ॲप्सचे करोडो वापरकर्ते आहेत. या ॲप्सचा वापर नागरिक दररोज मोठ्या संख्येनं करतात. त्यामुळं, ऑनलाइन फसवणूक करणारे ठग या ॲप्सचा वापर करून नागरिकांना चुना लावताय.
व्हॉट्सॲपच्या माध्यमातून सर्वाधिक फसवणूक : सर्वाधिक फसवणूक व्हॉट्सॲपच्या माध्यमातून होत आहे. 2024 च्या पहिल्या तीन महिन्यांत सरकारला व्हॉट्सॲपद्वारे सायबर फसवणुकीच्या सर्वाधिक 43 हजार 797 तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. यानंतर टेलिग्रामच्या माध्यमातून फसवणुकीच्या 22 हजार 680 तक्रारी आणि इन्स्टाग्रामद्वारे फसवणुकीच्या 19,800 तक्रारी आल्या. रिपोर्टमध्ये असं म्हटलं आहे की, सायबर ठग गुगल सर्व्हिस प्लॅटफॉर्मचा वापर करून असे गुन्हे करतात. त्यांच्या मदतीनं ते लोकांना लक्ष्य करतात.
'या' लोकांना सर्वाधिक केले जात टार्गेट : देशातील सायबर फसवणुकीच्या वाढत्या प्रकरणांदरम्यान आलेल्या गृह मंत्रालयाच्या या वार्षिक अहवालात असं म्हटलं आहे की अशा प्रकारची फसवणूक वेगवेगळ्या देशांमध्ये होत आहे. त्यात मोठ्या प्रमाणावर मनी लाँडरिंग आणि सायबर गुलामगिरीचाही समावेश आहे. बेरोजगार तरुण, गृहिणी, विद्यार्थी आणि इतर गरजू लोकांना सायबर फसवणुकीत सर्वाधिक लक्ष्य केलं जातंय. कर्ज घेतलेल्या पैशांचाही या पैशात समावेश आहे.
सरकारचं फेसबुकवरही लक्ष : सायबर ठग प्रायोजित फेसबुक जाहिरातींद्वारे देशात बेकायदेशीर कर्ज देणारी ॲप्स सुरू करत आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी, सरकार अशा लिंकची ओळख पटवत आहे. गरज भासल्यास या लिंक्स काढून टाकण्याच्या सूचनाही फेसबुकला देण्यात आल्या आहेत.
हे वाचलंत का :