हैदराबाद : CTET उत्तर की 2024 ctet.nic.in वर प्रसिद्ध करण्यात आली आहे. उमेदवार आता पेपर 1 आणि पेपर 2 साठी CTET डिसेंबर 2024 ची उत्तर पत्रिका डाउनलोड करू शकतात. इंथं तुम्ही थेट CTET उत्तर की 2024 PDF डाउनलोड लिंक करू शकता. उमेदवार 5 जानेवारी 2025 पर्यंत CTET उत्तर कीवर हरकती सादर करू शकतात. CTET OMR शीट 2024 देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे.
सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (CBSE) नं 1 जानेवारी 2025 रोजी CTET डिसेंबर 2024 परीक्षेसाठी अधिकृत उत्तर की जारी केली. CTET 2024 उत्तर की अधिकृत वेबसाइटवर OMR शीट आणि हरकत लिंकच्या स्कॅन केलेल्या प्रतींसह जारी केलीय. उमेदवार त्यांच्या नोंदणीकृत खात्यांमध्ये लॉग इन करून CTET उत्तर की 2024 PDF पेपर 1 आणि पेपर 2 डाउनलोड करू शकतात. CTET OMR शीट 2024 उमेदवारांच्या नोंदणीकृत खात्यांवर देखील उपलब्ध आहे. उमेदवार अधिकृत उत्तरांचं पुनरावलोकन करू शकतात. त्यांना कोणतेही उत्तर किंवा प्रश्न चुकीचे आढळल्यास, ते 5 जानेवारी 2025 पर्यंत आक्षेप सादर करू शकतात.
CTET Dec 2024 उत्तर की आणि OMR शीट कशी डाउनलोड करावी?
उमेदवार खाली दिलेल्या चरणांचे अनुसरण करून CTET डिसेंबर 2024 उत्तर की आणि OMR शीट डाउनलोड करू शकतात:
- अधिकृत ctet.nic.in. वेबसाइटला भेट द्या.
- उत्तर की लिंकवर क्लिक करा.
- रोल नंबर आणि जन्मतारीख टाका.
- उत्तरे काळजीपूर्वक पहा.
- CTET उत्तर की 2024 PDF डाउनलोड करा.
CTET उत्तर की आक्षेप 2024 :
- अधिकृत वेबसाइटला भेट द्या
- CTET उत्तर की आक्षेप लिंकवर क्लिक करा
- आवश्यक तपशील वापरून लॉग इन करा
- आक्षेप सबमिट करण्यासाठी उपलब्ध लिंकवर क्लिक करा.
उत्तर कीला आव्हान कसं द्यावं? :
- आव्हान देण्यासाठी प्रश्न निवडा
- ‘सिलेक्ट फॉर चॅलेंज’ बटणावर क्लिक करा
- 'तुमचं उत्तर प्रविष्ट करण्यासाठी क्लिक करा' लिंकवर क्लिक करा.
- निवडलेल्या प्रश्नासमोर योग्य उत्तराचा पर्याय निवडा.
- 'अपडेट' लिंकवर क्लिक करा.
- ‘फायनलाइज चॅलेंज सबमिशन’ बटणावर क्लिक करा.
- आक्षेप नोंदवण्यासाठी INR 1,000 पेमेंट करा.
हे वाचलंत का :