मुंबई- हार्दिक पांड्यानं त्याची पत्नी नताशा स्टॅनकोविकपासून घटस्फोट घेतल्यानंतर बॉलिवूड स्टार कपल अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्या वैयक्तिक आयुष्यावरही लोक लक्ष ठेवून आहेत. अलीकडेच मुकेश अंबानी यांनी त्यांचा मुलगा अनंत अंबानीच्या शाही थाटातील लग्नाचं आयोजन केलं होतं. यासाठी जगातील सेलेब्रिटींसह भारतीय फिल्म इंडस्ट्री एका छताखाली एकवटली होती. या लग्नाला अमिताभ बच्चन कुटुंबासह हजर होते. मात्र त्यांच्या बरोबर त्यांची सून ऐश्वर्या राय बच्चन आणि नात आराध्या लग्नास आले नव्हते. दोघेही स्वतंत्रपणे या लग्नासाठी हजर राहिल्या होत्या. यानंतर बच्चन कुटुंबात दुरावा निर्माण झाल्याची चर्चा सोशल मीडियात रंगताना दिसली आहे.
अभिषेक बच्चन त्याची स्टार पत्नी आणि मुलीला सोडून कुटुंबासह अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नाला आला होता. इतकेच नाही तर नुकतीच अभिषेक बच्चनने घटस्फोटाच्या पोस्टला लाईक केले होते. या पोस्टनंतर अभिषेक आणि ऐशमध्ये दुरावा निर्माण झाल्याचे मानले जात आहे. अशातच अमिताभ बच्चन यांनी काल रात्री केलेल्या पोस्टने आगीत तेल ओतण्याचं काम केलं आहे.
अमिताभ बच्चन यांची पोस्ट
18 जुलैच्या रात्री अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या एका एक्स-पोस्टमध्ये लिहिले की, 'कामावर परतणे कठीण आहे... पण आयुष्य कधीच सोपं नसतं'. आता बिग बींच्या या पोस्टचा संबंध अभिषेक आणि ऐश्वर्याच्या नात्यातील दरीशी जोडला जात आहे. कारण अमिताभ बच्चन यांची ही पोस्ट अभिषेकने दोनच दिवसांपूर्वी घटस्फोटाची पोस्ट लाईक केली होती त्या पार्श्वभूमीवर आली आहे.