महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

अमिताभ बच्चनची नात नव्यानं आयआयएमएमध्ये घेतला प्रवेश, 'त्याचा' फोटो शेअर करत मानले आभार - Navya Naveli - NAVYA NAVELI

Navya Naveli in IIMA : अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदानं कॅट आणि आयएटी (CAT/IAT) प्रवेश परीक्षा उत्तीर्ण केली. यानंतर बच्चन आणि नंदा कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे. नव्यानं कॉलेजच्या पहिल्या दिवसाचे फोटो शेअर करून आपला आनंद व्यक्त केला आहे.

Navya Naveli
नव्या नवेली ((फाइल फोटो) (IANS))

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 2, 2024, 10:20 AM IST

मुंबई - Navya Naveli in IIMA: आयआयएमएमध्ये प्रवेश मिळविणं म्हणजे बुद्धीची कसोटी लागते. त्यामुळेच अत्यंत कमी विद्यार्थ्यांना आयआयएमएमध्ये प्रवेश मिळणं शक्य होते. अशातच दिग्गज अभिनेता अमिताभ बच्चनची नात नव्या नवेली नंदानं पुढील दोन वर्षांसाठी बीपीजीपी एमबीए प्रोग्राम करण्यासाठी अहमदाबादमधील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये (आयआयएमए) प्रवेश घेतला आहे.

श्वेता बच्चन आणि निखिल नंदा यांची मुलगी नव्यानं सप्टेंबर रोजी कॉलेज कॅम्पसमधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर करून आनंद व्यक्त केला आहे. नव्याचे आयआयएमएच्या कॅम्पसमधील तिचे नवीन फोटो अनेकांना आवडले आहेत. हे फोटो शेअर करताना तिनं कॅप्शनमध्ये लिहिलं, "स्वप्न पूर्ण होतात. पुढील 2 वर्षे...चांगले लोक आणि शिक्षकांसह. 2026 चा ब्लेंडेड पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्राम (BPGP)क्लास."

नव्यानवेली नंदानं आयआयएमएमध्ये घेतला प्रवेश :शेअर केलेल्या पहिल्या फोटोमध्ये नव्या ही काळ्या रंगाचा सूट घालून आयआयएमच्या साइनबोर्डजवळ उभी असल्याची दिसत आहे. यानंतर तिनं सुंदर कॅम्पस आणि तिच्या नवीन मित्रांची झलकही शेअर केली आहे. नव्यानं तिच्या नवीन यशाचा आनंद साजरा करण्यासाठी केक कापतानाचा एक फोटोदेखील इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. कॅट आणि आयएटी ( CAT/IAT) प्रवेश परीक्षांच्या तयारीत मदत केल्याबद्दल नव्यानं तिचे शिक्षक प्रसाद यांचे आभार मानले आहेत. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये तिनं लिहिलं, "प्रवेश परीक्षेसाठी मला प्रशिक्षण दिल्याबद्दल धन्यवाद. प्रसाद सर यांनी मला कॅट आणि आयएटी ( CAT/IAT) प्रवेश परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी प्रशिक्षण देण्यात आणि तयार करण्यात मोठी भूमिका बजावली. मला सर्वोत्कृष्ट शिक्षकांकडून शिकण्याचा मान मिळाला आहे. ज्या दिवशी मला प्रवेश मिळाला, त्या दिवशी आयएमएस आणि एमबीए (IMS MBA) ऑफिसमध्ये हा आनंद साजरा केला आहे."

नव्याच्या कामगिरीबद्दल बच्चन आणि नंदा कुटुंब खुश : नव्याच्या या कामगिरीबद्दल तिची आई श्वेता बच्चननं अभिमानानं म्हटलं, "बाळा तू मला खूप अभिमानास्पद आहेस. नव्याच्या मैत्रिणी सुहाना खान, अनन्या पांडे, शनाया कपूर यांनीदेखील तिचे अभिनंदन केले आहेत. याशिवाय अभिनेत्री आलिया भट्ट, अर्जुन कपूर, नव्याचा भाऊ अगस्त्य नंदा, वरुण धवन यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details