सुरत/चंदीगड: अमेरिकेनं नवीन स्थंलतारण धोरणाअंतर्गत १०४ बेकायदेशीर स्थलांतरितांना भारतात परत पाठविलं आहे. त्या सर्वांना अमेरिकन हवाई दलाच्या अमेरिकेच्या सैन्यदलाच्या सी-१७ ग्लोबमास्टर विमानानं अमृतसर हवाई तळावर गुरुवारी उतरवण्यात आलं. या १०४ स्थलांतरितांमध्ये पंजाबमधील ३०, हरियाणा आणि गुजरातमधील प्रत्येकी ३३ बेकायदेशीर स्थलांतरिताचा समावेश आहे.
गुजरातमधील पाटण येथील चार जणांचे कुटुंबदेखील भारतात (US deportation of Indian migrants) परतलं आहे. गुजरातमधील पाटण येथील चार जणांच्या कुटुंबानं अमेरिकेला जाण्यासाठी सुरतमधील त्यांचे घर विकलं होतं. केतुल कुमार बाबूलाल पटेल आणि किरणबेन केतुल कुमार पटेल आणि त्यांची दोन मुले ही भारतात परतली आहेत. अमेरिकेच्या सैन्यदलाच्या विमानातून ३३ गुजराती भारतात परतले आहेत. त्यात या पटेल कुटुंबाचा समावेश आहे. पटेल कुटुंब पाटण जिल्ह्यातील मानुंड गावातील रहिवासी आहेत. त्यांच्या गावातील रहिवासी दीक्षित पटेल म्हणाले, "केतुल कुमार हे घर विकून अमेरिकेत गेले. यापूर्वी ते सुरतमध्ये काम करत होते. अमेरिकन सरकारनं त्यांना परत पाठविलं आहे. त्यांचं खूप मोठं नुकसान झालं."
व्यवसायात मंदी आल्यानं धरली अमेरिकेची वाट- केतुलच्या पालकांनी अमेरिकेत गेलेल्या त्यांच्या मुलाबद्दल आणि त्याच्या कुटुंबाबद्दल माहिती दिली. ते म्हणाले, "त्यांची दोन्ही मुले राकेश आणि केतुल सुरतमध्ये राहत होते. पण, हिरे उद्योगातील मंदीमुळे त्यांचा एक मुलगा केतुल काही महिन्यांपूर्वी एका एजंटमार्फत पत्नी आणि दोन मुलांसह अमेरिकेला गेला होता. गेल्या २५ वर्षांपासून त्यांचे दोन्ही मुले कुटुंबासह सुरतमधील हिरे उद्योगात काम करत होते. व्यवसायात मंदी आल्यामुळे केतुलनं सुरतमधील आपलं घर विकलं. तो आपल्या कुटुंबासह अमेरिकेत गेला." मुलगा कुटुंबासह सुखरुप भारतात परतल्यानं त्यांनी ईश्वराचे आभार मानलेत.
५० लाख रुपये खर्च - दलालामार्फत ५० लाख रुपये खर्च मुलगा अमेरिकेला गेला होता. त्यामुळे सरकारनं मदत करावी, अशी केतुलच्या आईनं अपेक्षा व्यक्त केली. मुलगा परत आल्यानं कुटुंब घरात आनंदानं एकत्र राहील, असा त्यांनी विश्वास व्यक्त केला.
कर्जाचं ओझं आणखी वाढणार-अमेरिकेनं परत पाठवलेल्या तरुणांमध्ये पंजाबच्या कपूरथला येथील तरफ बहबल बहादूर गावातील रहिवासी गुरप्रीत सिंगचा समावेश आहे. त्याच्या कुटुंबानं ४५ लाखांचं कर्ज काढून गुरप्रीतला अमेरिकेला पाठवलं होतं. मुलगा अमेरिकेत गेल्यानंतर कुटुंबाची परिस्थिती सुधारेल, अशी त्यांना आशा होती. पण, आता त्यांची घोर निराशा झालीय. अमेरिकेतून हद्दपार झालेल्या गुरप्रीतच्या वडिलांनी गदगदलेल्या स्वरात सांगितलं, "सुमारे २० दिवसांपूर्वी मुलगा माझ्याशी फोनवर बोलला होता. त्यानंतर गुरप्रीतला हद्दपार करण्यात आल्याची माहिती आम्हाला कळाली. कुटुंब आधीच कर्जात बुडाले. आता कर्जाचं ओझं आणखी वाढणार आहे." सरकारनं मदत करून गुरप्रीतला नोकरी द्यावी, अशी त्याच्या वडिलांनी मागणी केली.
इमिग्रेशन एजंटवर फसवणुकीचे आरोप- पंजाबच्या होशियारपूरच्या ताहली गावातील तरुण हरविंदर सिंगदेखील अमेरिकेतून हद्दपार झाल्यानंतर गुरुवारी त्याच्या घरी पोहोचले. हरविंदर सुमारे ८ महिन्यांपूर्वी विदेशात गेले होते. त्यांच्या पत्नी कुलजिंदर कौर यांनी एजंटला ४२ लाख रुपये दिले होते. पतीला अमेरिकेत पाठविण्यासाठी त्यांनी व्याजानं पैसे घेतले होते. एजंटनं त्यांना कायदेशीर मार्गानं अमेरिकेत पाठवण्याचं आश्वासन दिलं होतं. पती हद्दपार झाल्यानं त्यांनी दु:ख व्यक्त फसवणूक करणाऱ्या एजंटवर अंकुश लावण्याचं सरकारला आवाहन केलं आहे.
हेही वाचा-