गॉल SL VS AUS 2nd Test day 2 LIVE : श्रीलंका राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा आणि शेवटचा सामना 6 फेब्रुवारीपासून गॉल येथील गॉल आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्याचा आज दुसरा दिवस आहे.
The second Test pitch in Galle is yet to reveal its true characteristics but both sides are wary of what lurks beneath the surface ahead of day two #SLvAUS
— cricket.com.au (@cricketcomau) February 6, 2025
Read more: https://t.co/fvUmzqjxvS pic.twitter.com/wxqI6YzH6Q
पाहुण्यांचा संघ 1-0 नं आघाडीवर : पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियानं श्रीलंकेचा एक डाव आणि 242 धावांनी पराभव केला. यासह, पाहुण्या संघानं दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. आता ऑस्ट्रेलियाचा संघ दुसरा कसोटी सामना जिंकून मालिका जिंकण्याच्या प्रयत्नात असेल. दुसरीकडे, श्रीलंकेचा संघ दुसऱ्या कसोटीत पुनरागमन करु इच्छितो. दोन्ही संघांमध्ये एक रोमांचक कसोटी सामना पाहायला मिळतो. या मालिकेत श्रीलंकेची कमान धनंजय डी सिल्वाच्या हातात आहे. तर, ऑस्ट्रेलियाचं नेतृत्व स्टीव्ह स्मिथकडे आहे.
पहिल्या दिवशी काय झालं : तत्पूर्वी, श्रीलंकेचा कर्णधार धनंजय डी सिल्वानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक जिंकल्यानंतर, श्रीलंकेनं प्रथम फलंदाजी केली पण त्यांची सुरुवात निराशाजनक झाली आणि संघाला पहिला मोठा धक्का फक्त 23 धावांवर बसला. श्रीलंकेकडून दिनेश चंडिमलने सर्वाधिक 74 धावांची खेळी केली. दिनेश चांदीमल व्यतिरिक्त कुसल मेंडिसनं 59 धावा केल्या. कुसल मेंडिस सध्या नाबाद 59 धावांसह खेळत आहे. दुसरीकडे, स्टार गोलंदाज नाथन लायननं ऑस्ट्रेलियन संघाला पहिलं मोठं यश मिळवून दिलं. ऑस्ट्रेलियाकडून नॅथन लायन आणि मिचेल स्टार्क यांनी प्रत्येकी सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. नॅथन लायन आणि मिशेल स्टार्क व्यतिरिक्त मॅथ्यू कुहनेमननं दोन विकेट घेतल्या.
Kusal Mendis led a resilient fightback against Australia on Day 1️⃣ in Galle 👏#WTC25 #SLvAUS 📝: https://t.co/PVPw6kFuGn pic.twitter.com/PpnAFdoXj1
— ICC (@ICC) February 6, 2025
खेळपट्टी कशी असेल : श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा कसोटी सामना गॉल आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जात आहे. दुसऱ्या दिवशी या खेळपट्टीवर फलंदाजांसाठी खूप काही आहे. सामना जसजसा पुढं जाईल तसतसे ते हळूहळू खराब होत जाईल. खेळाच्या सुरुवातीला वेगवान गोलंदाजांना मैदानावरुन काही मदत मिळण्याची अपेक्षा आहे. या खेळपट्टीवर फिरकीपटू महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. पहिल्या कसोटी सामन्यातही फिरकीपटूंनी अनेक विकेट्स घेतल्या.
श्रीलंका विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात दुसऱ्या दिवसाचा खेळ कधी आणि कुठं खेळवला जाईल?
श्रीलंका विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात दुसऱ्या दिवसाचा खेळ 07 फेब्रुवारी (शुक्रवार) रोजी गॉल आंतरराष्ट्रीय स्टेडियम, गॉल इथं भारतीय वेळेनुसार सकाळी 10:00 वाजता सुरु होईल.
श्रीलंका विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात दुसऱ्या दिवसाचा खेळ कुठं आणि कसा पहायचा?
श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेचं थेट प्रक्षेपण भारतातील टीव्हीवर उपलब्ध होणार नाही. तथापि, चाहते फॅनकोड अॅप आणि वेबसाइटवर या सामन्याचं लाईव्ह स्ट्रीमिंग पाहू शकतात.
दोन्ही संघाची प्लेइंग 11 :
ऑस्ट्रेलिया : उस्मान ख्वाजा, ट्रॅव्हिस हेड, मार्नस लाबुशेन, स्टीव्हन स्मिथ (कर्णधार), जोश इंगलिस, अॅलेक्स केरी (यष्टीरक्षक), ब्यू वेबस्टर, कूपर कॉनोली, मिचेल स्टार्क, मॅथ्यू कुहनेमन, नॅथन लायन
श्रीलंका : पथुम निस्सांका, दिमुथ करुणारत्ने, दिनेश चांदीमल, अँजेलो मॅथ्यूज, कामिंदू मेंडिस, धनंजय डी सिल्वा (कर्णधार), कुसल मेंडिस (यष्टीरक्षक), रमेश मेंडिस, प्रभात जयसूर्या, निशान पेरिस, लाहिरू कुमारा
हेही वाचा :