ETV Bharat / entertainment

सलमान खानच्या आईचा चालताना गेला तोल, व्हिडिओ व्हायरल.... - SALMA KHAN

सलमान खानच्या आईचा चालत असताना तोल गेला. आता एक सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

Salman khan
सलमान खान (सलमान खान आणि त्याची आई सलमा (एएनआय))
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Feb 7, 2025, 12:03 PM IST

मुंबई : अभिनेता सलमान खानला त्याची आई सलमा खूप जास्त आवडते. जेव्हाही कौटुंबिक कार्यक्रमाचे फोटो आणि व्हिडिओ बाहेर येतात, तेव्हा सलमान त्याच्या आईबरोबर दिसत असतो. सलमाननं त्याच्या आईच्या वाढदिवशीही खास पोस्ट शेअर करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. सलमानची आई सलमा खानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये त्यांचा तोल हा जाताना दिसत आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप वेगानं व्हायरल होत आहे. सलमनानचे अनेक चाहते, त्याच्या आईविषयी आता चिंतेत असल्याचे दिसत आहे. या व्हायरल झालेल्या व्हिडिओवर अनेकजण आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.

सलमानच्या आईचा गेला तोल : व्हिडिओत सलमा खान या कुठेतरी बाहेर आहे आणि त्या त्यांच्या गाडीच्या दिशेन जाताना दिसत आहे. यानंतर त्यांचा अचानक तोल जातो आणि त्यांना एक मागे असलेली महिला पकडते. गाडीपर्यंत जाताना त्यांना अनेक लोकांची गरज पडली. सलमा खानच्या या व्हिडिओवर एका यूजरनं लिहिलं, 'तुम्ही तुमच्याबरोबर व्हीलचेअर का आणली नाही?' दुसऱ्या एकानं लिहिलं, 'सर्वांच्या प्रार्थना तुमच्यासोबत आहेत.' आणखी एकानं लिहिलं, 'संपूर्ण बॉलिवूडची आई आहे.' याशिवाय अनेकजण या व्हिडिओवर हार्ट इमोजी शेअर करत आहेत. दरम्यान सलमान अनेकदा आपल्या आईबरोबर फोटो शेअर करत असतो.

सलमानचं वर्कफ्रंट : सलमान खान त्याच्या पालकांची काळजी खूप घेत असतो, यासाठी त्याचे अनेकजण कौतुक देखील करत असतात. दरम्यान सलमानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो शेवटी 'सिंघम अगेन'मध्ये दिसला होता. या चित्रपटामधील त्याचा कॅमियो अनेकांना आवडला होता. तसेच त्याच्या आगामी प्रोजेक्ट्समध्ये 'सिकंदर' हा चित्रपट आहे. या चित्रपटामध्ये तो साऊथ अभिनेत्री रश्मिका मंदान्नाबरोबर दिसणार आहे. हा चित्रपट 2025मध्ये ईदच्या निमित्तानं प्रदर्शित होणार आहे. व्यतिरिक्त सलमानकडे 'वांटेड 2', 'द बुल', 'इंशाअल्लाह', 'दबंग 4', 'किक 2', 'नो एंट्री' आणि 'पवन पुत्र भाईजान' हे चित्रपट आहेत.

हेही वाचा :

  1. अक्षय कुमारनं सैफ अली खानच्या साहसाचं केलं कौतुक, सलमानशी मतभेदावरही दिलं स्पष्टीकरण
  2. शाहरुख खानपासून संजय दत्तपर्यंत बॉलिवूड स्टार आहेत सलमान खानच्या होस्टिंगचे फॅन
  3. सलमान खानसारखाचं 'बिन लग्नाचा' आहे हा साऊथ सुपरस्टार, डेटिंगच्या अफवा पसरुनही आहे अविवाहित

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.