मुंबई - Allu Arjun : अभिनेता अल्लू अर्जुन आगामी चित्रपट 'पुष्पा 2'साठी चर्चेत आहे. त्याचे चाहते त्याच्या आगामी चित्रपट 'पुष्पा 2 द रुल'च्या रिलीजची आतुरतेनं वाट पाहत आहेत. स्वातंत्र्यदिनी हा चित्रपट रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. 2023 च्या सुरुवातीला 'गदर 2' चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धमाका केला होता. आता 'गदर 2' दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी 'पुष्पा 2' चित्रपटासाठी अल्लू अर्जुनला शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान आता पुष्पा स्टार अल्लू अर्जुननं यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. 'पुष्पा 2' हा चित्रपट 500 कोटींच्या बजेटमध्ये बनला आहे.
'गदर 2' दिग्दर्शकांनं केली पोस्ट शेअर : दरम्यान 'गदर 2' चे दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी 15 एप्रिल रोजी एक पोस्ट शेअर करत लिहिलं की, ''मी नुकताच 'पुष्पा 2' चा टीझर पाहिला आहे, गेल्या वर्षी 15 ऑगस्ट रोजी 'गदर 2' चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता आणि यावर्षी स्वातंत्र्यदिनी अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2' बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालेल, माझ्या शुभेच्छा तुमच्याबरोबर आहेत, चित्रपटाच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन, विशेषत: अल्लू अर्जुन, तुझा लूक, आगमन विलक्षण आणि उत्कृष्ट आहे. आता अनिल शर्मा या पोस्टवर अनेकजण कमेंट्स करत आहेत. याशिवाय अल्लू अर्जुनवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.