मुंबई - कोरियन भाषेत बनलेली 'स्क्विड गेम' ही वेब सिरीज संपूर्ण जगाला हादरा देणारी ठरली होती. 'स्क्विड गेम' मालिकेचा पहिला सीझन नेटफ्लिक्सवर 2021 मध्ये स्ट्रीम झाला होता. पहिला हंगाम जागतिक पातळीवर हिट ठरला होता. आता या मालिकेचा दुसरा भागही रिलीज झाला असून त्याला जगभरातून प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. या शोच्या पहिल्या सिझनला जागतिक पातळीवर आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वाधिक व्यूव्ह्ज मिळाले होते. जीवाचा थरकाप उडवणारा हा धक्कादायक शो अल्पावधितच लोकप्रिय ठरला होता. आता पुन्हा एकदा तुफान प्रतिसाद दुसऱ्या भागालाही मिळत आहे. अशातच आता काही पोस्टर्स व्हायरल झाल्यानंतर या मालिकेचा भारतातही सिझन सुरू होणार का याची चर्चा रंगू लागली.
झाडून सगळे सुपरस्टार्स 'स्क्विड गेम इंडिया'मध्ये, चाहत्यांना 'दे धक्का' !! - SQUID GAME INDIA POSTER VIRAL
भारतीय चित्रपटसृष्टील दिग्गज सुपरस्टार्स 'स्क्विड गेम इंडिया'मध्ये झळकणार असल्याची एक पोस्ट व्हायरल झाली आहे. नेमकं काय घडलंय जाणून घेण्यासाठी वाचा.

By ETV Bharat Entertainment Team
Published : Jan 7, 2025, 1:28 PM IST
सध्या 'स्क्विड गेम इंडिया' असे शीर्षक असलेली काही सुपरस्टारची पोस्टर्स इंटरनेटवर व्हायरल झाली आहेत. या पोस्टरवर साऊथ सुपरस्टार विजय थलपती, ज्युनियर एनटीआर, रजनीकांत, कमल हासन, चिरंजीवी, मोहनलाल, नागार्जुना, नागा चैतन्य, महेशबाबू, सुर्या, विजय देवराकोंडा, धनुष, अल्लू अर्जुन, प्रभास, अजित, पवन कल्याण, मामुटी, दुलकर सलमान, यश, राम चरण, राणा दुग्गूबाती, हृतिक रोशन, विक्रम, विजय सेतुपती इत्यादी दिग्गज सेलेब्रिटीचे फोटो पोस्टरवर झळकले आहेत.
'स्क्विड गेम इंडिया'असा काही शो भारतात सुरू होणार आहे का, असा प्रश्न ही पोस्टर पाहून प्रेक्षकांना पडू शकतो. परंतु ही सर्व पोस्टर्स एआय ( AI ) जनरेटेड असून या नव्या तंत्राच्या वापरानं बनवण्यात आली आहेत. साऊथ स्टार्सना मोठा फॅन बेस असल्यामुळे ही पोस्टर्स व्हायरल झाली नसती तरच नवल. प्रियांका रेड्डी - रायलसीमा या सोशल मीडिया हँडलवर ही फोटोंची पोस्ट झळकली असून याला पाहून चाहते काही वेळ चकित होत आहेत. या पोस्टमध्ये "This is so good !! AI Generated !!" असं लिहिलं असल्यामुळे या प्रतिमा एआय ( AI ) जनरेटेड असल्याचं स्पष्ट होतं. परंतु कमालीचं साम्य यात दिसत असल्यामुळं या नव्या तंत्राचं आकर्षण वाढलं आहे.