मुंबई - Akshay Kumar and Tiger Shroff Video : हिंदी चित्रपटसृष्टीतील दोन ॲक्शन अभिनेते अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ त्यांच्या 'बडे मियाँ छोटे मियाँ' या चित्रपटामुळे सध्या चर्चेत आहेत. सध्या दोघेही 'बडे मियाँ छोटे मियाँ' या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करत आहेत. अक्षय आणि टायगरचा हा चित्रपट 10 एप्रिल रोजी बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन अली अब्बास जफर यांनी केलंय. दरम्यान, अक्षय आणि टायगरनं दिल्ली आणि लखनऊमध्ये देखील त्यांच्या चित्रपटाचं प्रमोशन केलं आहे. आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ या जोडीचा व्हायरल झाला आहे.
अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफचा व्हिडिओ व्हायरल : या व्हिडिओमध्ये अक्षय कुमार पहिल्यांदा उडी मारतो, तेव्हा त्याला टायगर श्रॉफ पकडतो. यानंतर जेव्हा टायगरची उडी मारण्याची वेळ येते, तेव्हा त्याला अक्षय सोडून देतो. याआधी स्विमिंग स्पर्धा केली झाली, ज्यामध्ये टायगरनं फसवणूक करून अक्षयला हरवले होते. अक्षय कुमारनं टायगरकडून मागील पराभवाचा बदला घेतला आहे. अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ अनेकदा आपले व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतात, त्यांचे व्हिडिओ अनेकांना आवडतात. आता अक्षयनं शेअर केलेल्या या व्हिडिओवर अनेकजण आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. या व्हिडिओवर चाहते अक्षयचं कौतुक करताना दिसत आहेत.