महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

'ॲनिमल' चित्रपटाबद्दल आदिल हुसैनच्या वादग्रस्त वक्तव्यावर भडकला दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा - Sandeep Vanga and Adil Hussain - SANDEEP VANGA AND ADIL HUSSAIN

Adil Hussain :'कबीर सिंग'मध्ये काम केलेल्या आदिल हुसैननं म्हटलं की, मला 200 कोटी रुपये मिळाले असते तरी मी संदीप रेड्डी वंगा यांच्या 'ॲनिमल' चित्रपटात काम केलं नसत. आता या वक्तव्यावरुन संदीप रेड्डी वंगा यांनी एक पोस्ट शेअर करून आदिल खडे बोल सुनावले आहेत.

Adil Hussain
आदिल हुसैन (instagram)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 12, 2024, 2:46 PM IST

मुंबई -Adil Hussain : अभिनेता रणबीर कपूर आणि रश्मिका मंदान्ना स्टारर मेगाब्लॉकबस्टर चित्रपट 'ॲनिमल' अजूनही चर्चेत आहे. 'ॲनिमल'नं बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई केली. या चित्रपटावर बरीच टीकाही करण्यात आली होती. दरम्यान अभिनेता आदिल हुसैन आणि 'ॲनिमल' डायरेक्टर संदीप रेड्डी वंगा यांच्यात वाकयुद्ध सुरू झालं आहे. आदिल हुसैननं एका मुलाखतीत म्हटलं आहे की, "मला जरी 200 कोटी रुपये फी 'ॲनिमल'साठी मिळाली असती तरी मी ऑफरला नाकारला असतं." आदिल हुसैननं संदीपच्या 'कबीर सिंग' चित्रपटात काम केलं होतं. आदिल हुसैनच्या मते संदीप रेड्डी वंगा हा एक दुराचारवादी म्हणजेच स्त्रियांचा आदर न करणारा आणि स्त्रियांना उपभोगाची वस्तू मानणारा व्यक्ती आहे.

संदीप रेड्डी वंगानं केली आदिल हुसैनवर टीका : या वक्तव्यानंतर संदीप रेड्डी यांचा राग वाढला आणि त्यांनी एआयच्या मदतीनं कबीर सिंग चित्रपटातील आदिलची व्यक्तिरेखा बदलण्याचा निर्णय केला. संदीप यांनी आदिल हुसैनला निवेदनाद्वारे म्हटलं की, "तुम्ही 30 आर्ट फिल्म्स केल्या आहेत, पण तुम्हाला कोणी ओळखत नाही. पण तुम्ही माझ्या 'कबीर सिंग' या चित्रपटातून लोकांच्या नजरेत आलात. मला खेद आहे की मी तुला कास्ट केलं." संदीपच्या वक्तव्याला विरोध करत आदिलनं म्हटलं, "यावर आता काय बोलू? तो असा विचार करतो हे खूप दुर्दैवी आहे. त्याच्या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आणि कदाचित त्यामुळे त्याची विचारसरणी अशी झाली आहे."

आदिल हुसैननं केला पटलवार : आदिल हुसैननं पुढं म्हटलं, "मला कबीर सिंगचे कलेक्शन माहित नाही, पण 'लाइफ ऑफ पाय' या चित्रपटानं 1 बिलियन डॉलर्स कमावले होते, मला वाटत नाही की त्याचा 'ॲनिमल' या चित्रपटाशी स्पर्धा करू शकणार नाही. मी अजूनही 'ॲनिमल' चित्रपट पाहिलेला नाही." आता संदीप रेड्डी वंगा आणि आदिल हुसैन यांच्यामध्ये जोरदार वाकयुद्ध पाहायला मिळत आहे. दरम्यान 'ॲनिमल' या चित्रपटानं जगभरात 917.82 कोटीची कमाई केली आहे. हा चित्रपट 100 कोटीच्या बजेटमध्ये बनवण्यात आला आहे. आदिल हुसैनच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर पुढं तो 'उलझ' या चित्रपटामध्ये जान्हवी कपूरबरोबर दिसणार आहे.

हेही वाचा :

  1. आदर्श जोडीदार कशी हवी? कार्तिक आर्यननं 'ही' व्यक्त केली अपेक्षा - Kartik Aaryan
  2. 'पुष्पा 2 द रुल'मध्ये मोठा बदल, महत्त्वाच्या व्यक्तीनं सोडली दिग्दर्शकाची साथ - Pushpa 2 The Rule
  3. दीपिका पदुकोणचा बेबी बंप पाहून चाहते म्हणतात, 'हिच्या पोटी जन्म घेणार कल्की!' - deepika padukone

ABOUT THE AUTHOR

...view details