मुंबई - महाकुंभमेळ्यादरम्यान अभिनेत्री सोनाली बेंद्रेनं पवित्र त्रिवेणी संगमात स्नान केलंय. तिनं तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर तिच्या धार्मिक यात्रेची झलक शेअर केली आहे. सोनाली बेंद्रेनं फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं, 'छोटे क्षण, मोठ्या आठवणी.' महाकुंभमेळ्यात तिचे पती गोल्डी बहलही हे देखील तिच्याबरोबर होते. 13 जानेवारी रोजी प्रयागराजमध्ये सुरू झालेला महाकुंभ 26 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीच्या दिवशी संपणार आहे. महाकुंभमेळ्यात लाखो भाविक पवित्र स्नान करण्यासाठी जात आहेत. महाकुंभमेळ्यामध्ये मनोरंजन जगतातील अनेक मोठ्या स्टार्सनी सहभाग घेतला होता.
सोनाली बेंद्रेनं पवित्र त्रिवेणी संगमात केलं स्नान :सोनाली बेंद्रेचे महाकुंभमेळ्या स्नान करत असतानाचे फोटो अनेकांना आवडत आहेत. तिचे चाहते तिच्या पोस्टवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. व्हायरल झालेल्या पहिल्या फोटोत सोनाली आपल्या पतीबरोबर असल्याची दिसत आहे. फोटोत हे जोडपे कॅज्युअल लूकमध्ये आहे. याशिवाय दुसऱ्या फोटोमध्ये गंगा नदीवरील घाट दाखविण्यात आलं आहे. तिसऱ्या फोटो सोनाली ही गंगा नदीच्या आत पूजा करताना दिसत आहे. तसेच आणखी एका फोटोमध्ये सोनाली टेलीस्कोपमधून प्रयागमधील दृश्य पाहताना दिसत आहे. सोनालीनं शेअर केलेली ही फोटो खूप आकर्षक आहे. तसेच संगममध्ये स्नान केल्यानंतर, सोनालीनं आरती देखील केली. सोनालीनं कुटुंबासह इतर धार्मिक विधींमध्ये भाग घेतला.