मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि रणबीर कपूर यांनी सौदी अरेबियामधील जेद्दामध्ये आयोजित रेड सी फिल्म फेस्टिव्हलमध्ये हजेरी लावली. यादरम्यान दोघेही हॉलिवूड स्टार्सबरोबर पोझ देताना दिसले. आता रेड सी फिल्म फेस्टिव्हलमधील या स्टार्सचे काही फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत. रेड सी फिल्म फेस्टिवल 9 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला होता. आता श्रद्धा कपूर आणि रणबीर कपूर या कार्यक्रमामधील त्यांच्या लूकमुळे चर्चेत आले आहेत. रेड सी फिल्म फेस्टिवलमध्ये श्रद्धा एका बहु-रंगीत चमकदार गाउनमध्ये दिसली. यावेळी ती खूप सुंदर दिसत होती.
श्रद्धानं दिली हॉलिवूड स्टार अँड्र्यू गारफिल्डबरोबर पोझ : तर दुसरीकडे 'स्पायडर मॅन' स्टार फेम अभिनेता अँड्र्यू गारफिल्ड हा आइवरी सूट, चेक शर्ट आणि टाय परिधान करून रेड कार्पेटवर झळकला. आता श्रद्धा कपूर आणि अँड्र्यू गारफिल्डचे काही फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत. यामध्ये दोन्ही स्टार्स एकत्र फोटोसाठी पोझ देण्यापूर्वी शेकहॅन्ड करताना दिसत आहेत. यानंतर त्यांनी थोड्या वेळ गप्पा मारल्या. याशिवाय या दोघांनी एकत्र फोटोसाठी पोझही दिली. अँड्र्यू गारफिल्ड आणि श्रद्धा कपूरला एकत्र पाहून अनेकांना आनंद झाला आहे. रेड कार्पेटवर अनेक स्टार्सनं फोटोसाठी पोझ देऊन या कार्यक्रमाची शोभा वाढली आहे.