मुंबई : बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेते आले आणि गेले, मात्र सलमान खान गेल्या तीन दशकांपासून आपल्या चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहे. आजही त्याचे चाहते त्याचा चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहांमध्ये लांबच लांब रांगा लावतात. आजही 'भाईजान'चे चाहते त्याची फॅशन आणि स्वॅग फॉलो करतात. सलमानचा 'बेबी जॉन'मधील कॅमिओ हा खूप जोरदार होता. आज 27 डिसेंबर रोजी सलमानचा वाढदिवस आहे. या विशेष प्रसंगी त्याच्या कमाईबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 'भाईजान' फक्त चित्रपटांमधूनच नाही तर, त्याचे दोन मोठे ब्रँड देखील आहेत. याशिवाय तो एक फिल्म प्रोडक्शन हाऊसही चालवतो.
सलमान खानची संपत्ती? :एका रिपोर्ट्सनुसार,'भाईजान' टीव्हीवरच्या काही सेकंदांच्या जाहिरातीसाठी 10 कोटी रुपये घेत असतो. याशिवाय तो व्यावसायिक जाहिरातींसाठी दुप्पट फी घेत असतो. तसेच त्याची एका चित्रपटाची फी 100 कोटींपेक्षा कमी नाही. बॉलिवूडचा टायगर सलमान खान हा, खऱ्या जीवनामध्ये देखील टायगर आहे. सध्या सलमान खानची एकूण संपत्ती 2,900 कोटी रुपये आहे. त्याच्या सर्वात लोकप्रिय टीव्ही रिॲलिटी शो 'बिग बॉस'मधून तो संपूर्ण सीझनमध्ये 250 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमावतो. 'बिग बॉस' हा शो जवळपास हा तीन महिने चालतो. यामधून तो महिन्याला 60 कोटीची कमाई करतो. मीडिया रिपोर्टनुसार देशातील सर्वात श्रीमंत अभिनेत्यांच्या यादीत सलमान खानचा चौथ्या क्रमांक येतो. बॉलिवूड कलाकारांमध्ये त्याचे स्थान शाहरुख खान आणि जुही चावलानंतर तिसरे आहे.
देशातील सर्वात श्रीमंत अभिनेत्यांची यादी
शाहरुख खान- 7300 कोटी रुपये
जुही चावला- 4600 कोटी रुपये
नागार्जुन- 3310 कोटी रुपये
सलमान खान - 2900 कोटी रुपये