मुंबई Bhool Bhulaiyaa 3 :अनीस बज्मी दिग्दर्शित 'भूल भुलैया 3' हा चित्रपट सध्या खूप चर्चेत आहे. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून कार्तिक आर्यनचे चाहते 'भूल भुलैया 3'च्या प्रत्येक अपडेटबद्दल उत्सुक आहेत. या चित्रपटाद्वारे कार्तिक पुन्हा एकदा 'रुह बाबा'च्या भूमिकेत धमाका करण्यासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटाची शूटिंग खूप दिवसांपासून सुरू आहे. अनेकदा कार्तिक चित्रपटाच्या सेटवरील फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांबरोबर शेअर करत असतो. दरम्यान या चित्रपटाच्या टीझर आणि ट्रेलरबद्दल एक अपडेट समोर आली आहे. या चित्रपटाची शूटिंग कोलकाता, मध्य प्रदेश आणि मुंबईत झाली आहे.
'भूल भुलैया 3'च्या टीझर आणि ट्रेलरबद्दल अपडेट : अलीकडे एका कार्यक्रमात कार्तिकनं आगामी चित्रपट 'भूल भुलैया 3'बद्दल चर्चा केली. यामध्ये त्यानं सांगितलं की, या चित्रपटाच्या पोस्ट प्रॉडक्शनचं काम पूर्ण झालय. काही दिवसांनी टीझर रिलीज होत असल्यानं चाहत्यांना फारशी वाट पाहावी लागणार नसल्याचं त्यानं म्हटलं. 'भूल भुलैया 3'चा टीझर खूप छान असल्याचं देखील त्यानं यावेळी सांगितलं. 'भूल भुलैया 3'ला अंतिम टच देण्याचं काम सुरू आहे आणि काही गाणी देखील प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याची त्यानं माहिती दिली. 'भूल भुलैया 3' हा चित्रपट या दिवाळीत चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.