मुंबई : बॉलिवूडचे पॉवरपॅक कपल अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय हे त्यांच्या घटस्फोटाच्या अफवांमुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. या अफवा अजून संपल्या नाहीत, आता आणखी एक बातमी या जोडप्याबद्दल वणव्यासारखी पसरली आहे. नुकताच अभिषेक बच्चनचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये तो त्याच्या दुसऱ्या मुलाच्या प्लॅनिंगबद्दल मोकळेपणानं बोलताना दिसत आहे. अलीकडेच अभिषेकनं रितेश देशमुखच्या चॅट शोमध्ये पाहुणा म्हणून हजेरी लावली. शोदरम्यान ऐश्वर्या रायचं नाव घेत, रितेशनं अभिषेकची दुसरे मूल करण्याबाबत खिल्ली उडवली. रितेश अभिषेकला विचारतो की, "अमिताभजी, ऐश्वर्या, आराध्या आणि तू अभिषेक या सर्वांची सुरुवात 'अ' अक्षरानं होते. मग जया आंटी आणि श्वेता यांनी काय केलं?" यावर अभिषेक हसतो आणि उत्तर देतो, "तुम्हाला याविषयी त्यांना विचारावं लागेल. पण मला वाटतं ती आमच्या घरची परंपरा बनली आहे."
रितेशनं उडवली अभिषेक बच्चनची खिल्ली : यानंतर रितेश त्याला पुढं म्हणतो, 'आराध्यानंतर?' यावर अभिषेक उत्तर देतो, "नाही, पुढची पिढी आल्यावर बघू." यानंतर रितेश त्याला चिडवत म्हणातो, "इतका वेळ कोण थांबणार?" यावर अभिषेक हसतो. तसेच तिथे उपस्थित असणारे प्रेक्षक देखील या विनोदावर हसताना दिसतात. यानंतर रितेशच्या या वक्तव्यावर अभिषेक म्हणतो, "वयाचा रितेशचा विचार कर. मी तुझ्यापेक्षा मोठा आहे." यावर रितेश त्याच्या पायाला हात लावतो आणि हा विषय तिथेच संपवतो. रितेश देशमुखला रियान, राहिल अशी दोन मुले आहेत. बऱ्याचदा तो आपली पत्नी जेनेलिया डिसूजा आणि मुलांबरोबर बाहेर स्पॉट होतो.