महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

अभिषेक बच्चन स्टारर 'आय वॉन्ट टू टॉक'मधील फर्स्ट लूक रिलीज, पाहा पोस्टर - FIRST LOOK OUT FROM I WANT TO TALK

'आय वॉन्ट टू टॉक'मधील अभिषेक बच्चनचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे. यामध्ये अभिषेक एका वेगळ्या अंदाजात दिसत आहे.

abhishek bachchan
अभिषेक बच्चन (अभिषेक बच्चनचा फर्स्ट लूक (Movie Poster))

By ETV Bharat Entertainment Team

Published : Oct 25, 2024, 1:05 PM IST

मुंबई -अभिषेक बच्चनपत्नी ऐश्वर्या रायपासून घटस्फोटाच्या अफवांमुळे आणि त्याच्या 'आय वॉन्ट टू टॉक' या नवीन चित्रपटासाठी चर्चेत आहे. आज 25 ऑक्टोबर रोजी 'आय वॉन्ट टू टॉक' चित्रपटातील अभिषेक बच्चनचा फर्स्ट लूक समोर आला आहे. या चत्रपटाचे दिग्दर्शन शूजित सरकार यांनी केलंय. 'आय वॉन्ट टू टॉक'मधील अभिषेकचा फर्स्ट लूक रिलीज होण्यापूर्वी चित्रपटाचा टीझरही रिलीज करण्यात आला होता. 'आय वॉन्ट टू टॉक'मधील अभिषेक बच्चनच्या फर्स्ट लूकबद्दल बोलायचं झालं तर, तो खूपच इंटेंस लूकमध्ये दिसत आहे.

अभिषेक बच्चनचा फर्स्ट लुक? :'आय वॉन्ट टू टॉक' या चित्रपटाच्या फर्स्ट लूकमध्ये अभिषेक बच्चन पिवळ्या प्रिंटच्या शॉर्ट आणि लांब जॅकेटमध्ये उभा असल्याचा दिसत आहे. फर्स्ट लुक पोस्टरमध्ये अभिषेकचे मोठे पोट दिसत असून त्याच्यावर रेषा दिसत आहेत. याशिवाय अभिषेकच्या डाव्या हातावर एक पट्टी बांधली आहे. याशिवाय त्याच्या डोळ्यांवर चष्मा असल्याचा दिसत आहे. आता त्याचा हा लूक सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांना आवडत आहे. अनेकजण या पोस्टवर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. याशिवाय त्याच्या या आगामी चित्रपटासाठी त्याला शुभेच्छा देत आहेत.

'आय वॉन्ट टू टॉक'च्या टीझर : एका कारमध्ये अभिषेक बच्चनचा छोटा पुतळा बसवल्याचं टीझरमध्ये दाखविण्यात आलं होतं. यानंतर टीझरमध्ये अभिषेक म्हणतो, "मला बोलायला आवडते, मी फक्त बोलण्यासाठी जगतो. मला जिवंत आणि मेलेल्या माणसांमध्ये एवढाच फरक दिसतो की जिवंत लोक बोलू शकतात, मेलेले लोक बोलू शकत नाहीत." हा टीझर शेअर करताना अभिषेकनं यावर लिहिलं होतं, 'आपण सर्वजण त्या व्यक्तीला ओळखतो, ज्याला बोलायला आवडते आणि जी नेहमी आयुष्याची चांगली बाजू पाहतो, त्याला कितीही जीवनात आव्हाने आली तरीही. टॅग करा ज्याला बोलायला आवडते.'

'आय वॉन्ट टू टॉक' कधी होईल रिलीज :'आय वॉन्ट टू टॉक'चं दिग्दर्शन शूजित सरकार यांनी केलंय. रितेश शाहनं चित्रपटाची पटकथा आणि संवाद लिहिले आहेत. रॉनी लाहिरी आणि शील कुमार यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. पर्ले डे, अहिल्या बंबरू,अभिषेक बच्चन, जयंत कृपलानी, क्रिस्टीन गोडार्ड आणि जॉनी लीव्हर या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. 'आय वॉन्ट टू टॉक' 22 नोव्हेंबरला रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा :

  1. बच्चन कुटुंबाची 'रोका'साठी घाई, ऐनवेळी घाबरली होती ऐश्वर्या राय
  2. अभिषेक आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्या घटस्फोटाच्या व्हायरल व्हिडिओबाबत आता सत्य आलं समोर - AISHWARYA BACHCHAN
  3. अभिषेक बच्चन स्टारर 'आय वॉन्ट टू टॉक'चा टीझर रिलीज, पाहा व्हिडिओ

ABOUT THE AUTHOR

...view details