महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

अभिषेक बच्चन 'हाउसफुल 5' च्या स्टार स्टडेट कास्टमध्ये परतणार, साजिद नाडियाडवालाची घोषणा - Housefull 5 - HOUSEFULL 5

निर्माता साजिद नाडियाडवाला यांनी 'हाऊसफुल 5' मध्ये अभिषेक बच्चन परतणार असल्याची घोषणा केली आहे. अभिषेक बच्चनचं विनोदाचं टाइमिंग, समर्पण आणि प्रमाणिकपणा याचा लाभ चित्रपटाला होईल असं नाडियाडवाला यांनी म्हटलंय.

Abhishek Bachchan
साजिद नाडियाडवाला आणि अभिषेक बच्चन (( Photo Sajid Nadiadwala Instagram ))

By ETV Bharat Marathi Team

Published : May 6, 2024, 1:06 PM IST

मुंबई - हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रतिष्ठीत निर्माता साजिद नाडियाडवाला यांनी हाऊसफुल फ्रँचाइजीचा 5 वा चित्रपट बनवत असल्याची घोषणा केल्यापासून त्यातील स्टार कास्टकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. आता नाडियाडवाला यांनी अभिषेक बच्चन 'हाऊसफुल 5' च्या स्टार-स्टडेड कास्टमध्ये परत सामील होणार असल्याची घोषणा केली आहे.

ऑगस्ट 2024 पासून 'हाऊसफुल 5' चित्रपटाचे यूकेमध्ये शूटिंगला सुरूवात होणार असून या हा भाग एक खळबळजनक साहस असल्याचं सांगण्यात येत आहे. अभिषेक बच्चनच्या विनोदी टाइमिंगच्या मिश्रणाने चाहत्यांना आणखी हशा आणि मनोरंजनाची पर्वणी मिळू शकते असा अंदाज वर्तवण्यात येतो.

याबद्दल आनंद व्यक्त करताना साजिद नाडियादवाला म्हणाले, "अभिषेकला हाऊसफुल फ्रँचायझीमध्ये परत आणण्यासाठी मी रोमांचित आहे. त्याचं समर्पण, विनोदाची टायमिंग आणि प्रामाणिकपणा केवळ आमच्या चित्रपटाला फायदेशीर ठरेल."

यावर अभिषेक बच्चनने म्हटलंय, "हाऊसफुल माझ्या आवडत्या कॉमेडी फ्रँचायझींपैकी एक आहे आणि परत येणं म्हणजे घरी परतल्यासारखं वाटतं. साजिद नाडियादवालाबरोबर काम करणं नेहमीच खूप आनंददायी आहे. मी माझे सहकारी कलाकार अक्षय आणि रितेशसोबत सेटवर मजा करायला उत्सुक आहे. मी माझ्या प्रिय मित्र तरुण मनसुखानीबरोबर पुन्हा काम करण्यासाठी खूप उत्सुक आहे.

तरुण मनसुखानी दिग्दर्शित 'हाऊसफुल 5' हा लॉजिस्टिक लेन्समधील आव्हानात्मक चित्रपटांपैकी एक असल्याचे मानले जाते. हा चित्रपट अक्षय कुमार, रितेश देशमुख आणि आता अभिषेक बच्चन यांच्यासह स्टार-स्टडेड लाइनअपसह क्रूझमध्ये शूट केला जाणार आहे.

दरम्यान, सध्या देशभर लोकसभा निवडणूकीचं वारं जोरात वाहतंय. यावेळच्या निवडणूकीत अभिषेक बच्चन प्रयागराजमधून समाजवादी पक्षाच्या वतीनं निवडणूक लढवणार असल्याची चर्चा काही काळापासून सुरू होती. यापूर्वी अमिताभ बच्चन यांनी याच मतदार संघातून 1984 मध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीनं लढवली होती आणि मोठ्या मताधिक्क्यानं ती जिंकलीही होती. अमिताभ यांचं बालपण अलाहाबादमध्ये गेलं असल्यानं या शहराचं बच्चन कुटुंबीयांशी मोठं नातं आहे, त्यामुळे या जागी अभिषेक बच्चनला उमेदवारी देण्याची चर्चा रंगली होती. मात्र अभिषेकनं अजून तरी राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे समजावादी पक्षानं या ठिकाणी आपला दुसरा उमेदवार रिंगणात उतरला आहे.

हेही वाचा -

  1. करण जोहरची नक्कल केल्यानंतर कॉमेडियन केतन सिंगनं मागितली माफी, एकता कपूरनं केलं समर्थन - Karan johar ekta kapoor
  2. डिलीट केलेल्या फोटोवर भाष्य करण्यासाठी सामंथा रुथ प्रभूने शेअर केली 'गूढ पोस्ट' - Samantha Ruth Parbhu
  3. जागतिक हास्य दिन साजरा करण्याची काजोलची खास पद्धत, केला मजेदार व्हिडिओ शेअर - world laughter day

ABOUT THE AUTHOR

...view details