महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

बिग बॉस फेम अब्दू रोजिकनं केला साखरपुडा, फोटो व्हायरल - Abdu Rozik shares pictures - ABDU ROZIK SHARES PICTURES

Abdu Rozik Engagement : जगातील सर्वात तरुण गायक अब्दू रोजिक विवाहबंधनात अडकणार आहे. सोशल मीडियावर त्यानं त्याच्या साखरपुड्यामधील काही फोटो पोस्ट केले आहेत.

Abdu Rozik Engagement
अब्दू रोजिक साखरपुडा (अब्दु रोजिक(Abdu Rozik - Instagram))

By ETV Bharat Marathi Team

Published : May 11, 2024, 3:59 PM IST

मुंबई - Abdu Rozik Wedding : 'बिग बॉस 16'चा स्पर्धक गायक अब्दू रोजिक सेटल होणार आहे. अब्दुनं काल 10 मे रोजी काही फोटो शेअर केले होते. या फोटोमध्ये तो साखरपूडा करताना दिसत आहे. याशिवाय तो लवकरच लग्न देखील करणार असल्याचं समजत आहे. दरम्यान व्हायरल झालेल्या फोटोत अब्दू त्याच्या होणाऱ्या पत्नीबरोबर दिसत आहे. अब्दू रोजिकची होणारी पत्नी पांढऱ्या बुरख्यात दिसत आहे, त्यामुळे तिचा चेहरा दिसला नाही. अब्दूनं या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलं "अलहमदुलिल्लाह." यासोबतच त्यानं त्याच्या एंगेजमेंटची तारीखही उघड केली आहे. या पोस्टमध्ये त्यानं सांगितलं की त्याची एंगेजमेंट यावर्षी 24 एप्रिल रोजी झाली होती.

अब्दू रोजिकचा झाला साखरपूडा :सलमान खानच्या आवडत्या स्पर्धकांपैकी एक असलेल्या अब्दु रोजिकची होणारी पत्नीचं नाव अमीरा असून ती शारजाहची आहे. शेअर केलेल्या पहिल्या फोटोत तो त्याच्या होणाऱ्या पत्नीकडे हिऱ्याची अंगठी घेऊन प्रेमानं पाहत आहे. दुसऱ्या फोटोत, अब्दू अमीराला अंगठी घालताना दिसत आहे. अब्दू रोजिक 7 जुलै रोजी लग्न करणार आहे. याबद्दल अब्दूनं सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करून सांगितलं आहे. अब्दू हा प्रसिद्ध सोशल मीडिया स्टार आणि गायक आहे. तो टीव्ही रिॲलिटी शो 'बिग बॉस'मधून चर्चेत आला होता. अब्दू रोजिकनं तरुण वयातच करोडोंची संपत्ती कमावली आहे.

अब्दु रोजिकनं शेअर केला होता व्हिडिओ :अब्दु रोजिक हा सलमान खानच्या 'बिग बॉस 16' या शोचा भाग झाल्यानंतर तो जगभर प्रसिद्ध झाला. अब्दु हा 20 वर्षांचा गायक असून त्याची उंची फक्त 94 सेंटीमीटर आहे. याशिवाय त्यांची पत्नी ही 19 वर्षाची असून त्याच्या पेक्षा ती एक वर्षांनी लहान आहे. त्याचे सोशल मीडियावर खूप फॉलोअर्स आहेत. दरम्यान अब्दूनं तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर करून तिची एंगेजमेंट रिंग दाखवली होती. या व्हिडिओमध्ये अब्दू क्लाउड नाइनवर आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्यानं लिहिलं होत की, "माझ्या आयुष्यात हा दिवस येईल, मला प्रेम मिळेल आणि माझ्या आयुष्यातील समस्या समजून घेणारा प्रेमळ जोडीदार येईल, 7 जुलैला मी वाचवू शकत नाही. मी खूप आनंदी आहे."

अब्दुच्या लग्नाचे स्टार पाहुणे : 'बिग बॉस 16' नंतर बॉलिवूड आणि भारतीय टीव्ही इंडस्ट्रीतील अनेक मोठे स्टार्स आता अब्दुचे मित्र बनले आहेत. यामध्ये सलमान खानचे नाव आघाडीवर आहे. या लग्नात फराह खान, साजिद खान, एआर रहमान, 'बिग बॉस 16' चे स्पर्धक शिव ठाकरे, निमृत कौर अहलुवालिया, सुंबूल तौकीर खान आणि गायक एमसी स्टेन लग्नाला हजेरी लावू शकतात.

हेही वाचा :

  1. गरोदरपणाच्या पुस्तकात धर्मग्रंथाचं नाव वापरल्यानंतर उच्च न्यायालयानं करीना कपूरला बजावली नोटीस - kareena kapoor khan
  2. 'सरफरोश'ला 25 वर्षे पूर्ण, आमिर खाननं स्क्रिनिंगदरम्यान 'सरफरोश 2'ची केली घोषणा - aamir khan
  3. राजकुमार राव अभिनीत 'श्रीकांत' केली पहिल्या दिवशी धमाकेदार कमाई - rajkummar rao

ABOUT THE AUTHOR

...view details