महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

आमिर खान आणि कुस्तीपटू विनेश फोगटचा व्हिडिओ व्हायरल, चाहत्यांनी केली 'दंगल 2'ची मागणी - aamir speaks to vinesh - AAMIR SPEAKS TO VINESH

Aamir Khan and Vinesh Phogat: पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये धमाका करणारी भारताची कुस्तीपटू विनेश फोगटशी आमिर खान हा नुकताच व्हिडिओ कॉलवर बोलला. आता त्यांचा व्हिडिओ सोशल व्हायरल होत आहे.

Aamir Khan and Vinesh Phogat
आमिर खान आणि विनेश फोगट (आमिर खान आणि विनेश फोगाट (IANS))

By ETV Bharat Entertainment Team

Published : Sep 2, 2024, 2:44 PM IST

मुंबई - Aamir Khan and Vinesh Phogat: पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दुर्दैवानं सुवर्णपदक हुकलेली भारतीय कुस्तीपटू विनेश फोगट नुकतीच देशात परतली आहे. 50 किलो फ्रीस्टाइल कुस्तीमध्ये अंतिम फेरीत पोहोचलेल्या विनेशचं वजन 100 ग्रॅम अतिरिक्त भरल्यामुळेअंतिम फेरीतून बाहेर पडावं लागलं होतं. यानंतर संपूर्ण देश हा नाराज झाला होता. सर्वसामान्यांपासून ते बॉलिवूड स्टार्सनं विनेश फोगटला यावेळी प्रोत्साहन दिलं होतं. तिचा आता देखील देशात गौरव केला जात आहे. दरम्यान सोशल मीडियावर विनेश फोगट आणि बॉलिवूड स्टार आमिर खान यांच्यातील संभाषणाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

आमिर खान कुस्तीपटू विनेश फोगटचा व्हिडिओ आणि फोटो व्हायरल : या व्हिडिओमध्ये आमिर खान कुस्तीपटू विनेशबरोबर व्हिडिओ कॉलवर बोलताना दिसत आहे. व्हिडिओत आमिर खान कुस्तीपटू विनेशच्या पॅरिस ऑलिम्पिकमधील उत्कृष्ट कामगिरीबद्दल तिचे अभिनंदन करताना दिसत आहे. तसेच व्हायरल फोटो आणि व्हिडिओत माजी कुस्तीपटू कृपा शंकर देखील आहे. व्हिडिओमध्ये विनेश आमिर खानशी बोलत असताना हसताना दिसत आहे. आता व्हिडिओ आणि फोटोंवर अनेक यूजर्स प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरनं या पोस्टवर लिहिलं आहे की, "दंगल 2' सुरू आहे." दुसऱ्या यूजरनं लिहिलं, "चॅम्पियन." याशिवाय अनेक यूजर्स 'दंगल 2'ची मागणीही करत आहेत.

चाहत्यांनी केली 'दंगल 2'ची मागणी : 2016 मध्ये आमिर खाननं 'दंगल' हा चित्रपट केला होता, यामध्ये त्यानं माजी कुस्तीपटू महावीर फोगट यांची भूमिका साकारली होती. विनेश फोगट ही माजी कुस्तीपटू महावीर सिंग फोगट यांची भाची आहे. 'दंगल 2' हा भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट आहे. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर 2 हजार कोटीपेक्षा जास्त कमाई केली होती. आता आमिर खानचे चाहते 'दंगल 2' या चित्रपटाची आतुरतेनं वाट पाहत आहेत. दरम्यान आमिर खानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो 'लाल सिंग चड्ढा' या चित्रपटात शेवटी दिसला होता. आता तो सनी देओलबरोबर त्याच्या प्रोडक्शन हाऊसममधील 'लाहोर 1947' हा चित्रपट करत आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेची प्रतीक्षा आता चाहत्यांना आहे.

हेही वाचा :

  1. आमिर खाननं राज पंडित यांंच्या 'कुडिए' गाण्याच्या लॉन्चिंग इव्हेंटमध्ये जुनैद खानची केली प्रशंसा - Aamir Khan Praises Junaid Khan
  2. विनेशच्या स्वागतावेळी बजरंगनं सर्व मर्यादा ओलांडत केला तिरंग्याचा अपमान? नेटिझन्सनं कुस्तीपटूला फटकारलं - Bajrang Punia Criticised
  3. "देव तुम्हाला शुद्ध बुद्धी देवो..."; भारतात परतल्यावर विनेश फोगटवर मेहुणे भडकले - Vinesh Phogat criticize

ABOUT THE AUTHOR

...view details