महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

69वा सोभा फिल्मफेअर पुरस्कार सोहळा पडला पार, विजेत्यांची यादी आली समोर - 69th SOBHA Filmfare Awards - 69TH SOBHA FILMFARE AWARDS

69th SOBHA Filmfare Award 2024: 69वा सोभा फिल्मफेअर पुरस्कार सोहळा जेआरसी कन्व्हेन्शन सेंटर, हैदराबाद येथे आयोजित करण्यात आला होता. दरवर्षीप्रमाणे यावेळी तेलुगू, तमिळ, मल्याळम आणि कन्नड चित्रपटातील सर्वोत्कृष्ट कलाकार, संगीतकार, दिग्दर्शक आणि क्रू मेंबर्सना गौरविण्यात आलं.

69th SOBHA Filmfare Award 2024
69वा सोभा फिल्मफेअर पुरस्कार 2024 ((Nani Siddharth Instagram))

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 4, 2024, 4:49 PM IST

हैदराबाद- 69th Filmfare Awards South Winners 2024: 69 वा सोभा फिल्मफेयर अवार्ड्स हा सोहळा शनिवारी 3 ऑगस्ट रोजी हैदराबादच्या जेआरसी (JRC) कन्व्हेन्शन सेंटरमध्ये आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात अनेक स्टार सहभागी झाले होते. अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते, गायक आणि इतर क्रू मेंबर्सनी तेलुगू, तमिळ, कन्नड आणि मल्याळम चित्रपटातून खूप प्रसिद्धी मिळवली आहे. तेलुगू स्टार नानीच्या 'दसरा' चित्रपटानं 6 पुरस्कार जिंकले. तर सिद्धार्थच्या तामिळ चित्रपट 'चिट्ठा'नं 7 पुरस्कार आपल्या नावावर केले आहेत. आता सोभा फिल्मफेअर पुरस्कारमधील विजेत्यांची यादी समोर आली आहे.

फिल्मफेअर पुरस्कार तेलुगू विजेते

  • सर्वोत्कृष्ट चित्रपट: बालागम
  • सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : वेणु येलदंडी (बालागम )
  • सर्वोत्कृष्ट चित्रपट (समीक्षक) :साई राजेश (बेबी)
  • प्रमुख भूमिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेता : नानी (दसरा)
  • सर्वोत्कृष्ट अभिनेता (क्रिटिक्स): प्रकाश राज (रंगा मार्तण्ड), नवीन पॉलीशेट्टी (मिस शेट्टी, मिस्टर पॉलीशेट्टी)
  • मुख्य भूमिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : कीर्ती सुरेश (दसरा)
  • सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (क्रिटिक्स) : वैष्णवी चैतन्य (बेबी)
  • सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता : ब्रह्मानंदम (रंगा मार्तंड), रवि तेजा (वॉल्टेअर वीरैया)
  • सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री : रूपा लक्ष्मी (बालागम)
  • सर्वोत्कृष्ट संगीत अल्बम: बेबी (विजय बुल्गानिन)
  • सर्वोत्कृष्ट लिरिक्स: अनंत श्रीराम (ओ रेंदु प्रेम मेघालीला- बेबी)
  • सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक : श्रीराम चंद्र (ओ रेंदु प्रेम मेघालीला- बेबी)
  • सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका : श्वेता मोहन (मस्तारू मस्तारू - सर)
  • सर्वोत्कृष्ट छायांकन : सत्यन सूर्यन (दसरा)
  • सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शन: प्रेम रक्षित (धूम धाम प्रतिष्ठान- दसरा)
  • सर्वोत्कृष्ट निर्मिती डिझाइन: कोल्ला अविनाश (दसरा)
  • सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक: श्रीकांत ओडेला (दसरा), शौरयुव (हाय नन्ना)
  • सर्वोत्कृष्ट पदार्पण (मेल): संगीत शोभन (एमएडी)

फिल्मफेअर पुरस्कार तामिळ विजेते

  • सर्वोत्कृष्ट चित्रपट : चिट्ठा
  • सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : एस. यू. अरुण कुमार (चिट्ठा)
  • सर्वोत्कृष्ट चित्रपट (क्रिटिक्स): विदुथलाई- पार्ट1 (वेत्री मारन)
  • प्रमुख भूमिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेता (पुरुष): विक्रम (पोन्नियिन सेलवन- पार्ट 2)
  • सर्वोत्कृष्ट अभिनेता (क्रिटिक्स) : सिद्धार्थ (चिठ्ठा)
  • प्रमुख भूमिकेत सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (महिला): निमिषा सजयन (चिट्ठा)
  • सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (क्रिटिक्स) : ऐश्वर्या राजेश (फरहाना), अपर्णा दास (दादा)
  • सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता : फहद फासिल (मामन्नान)
  • सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री: अंजली नायर (चिट्ठा)
  • सर्वोत्कृष्ट संगीत अल्बम: ढिबू निनान थॉमस और संतोष नारायणन (चिट्ठा)
  • सर्वोत्कृष्ट लिरिक्स: इलंगो कृष्णन (आगा नागा- पोन्नियिन सेलवन पार्ट 2)
  • सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक : हरिचरण (चिन्नानजिरु निलावे- पोन्नियिन सेलवन पार्ट 2)
  • सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका: कार्तिका वैद्यनाथन (कंगल एधो-चिट्ठा)
  • सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी: रवि वर्मन (पोन्नियिन सेलवन पार्ट 2)
  • सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझाईन: थोटा थरानी (पोन्नियिन सेलवन पार्ट 2)

ABOUT THE AUTHOR

...view details