मुंबई - Emmy Awards Nominees 2024 : इंटरनॅशनल ॲकॅडमी ऑफ टेलिव्हिजन आर्ट्स अँड सायन्सेसनं 19 सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कारांसाठी नामांकनांची घोषणा केली आहे. आदित्य रॉय कपूर, शोभिता धुलिपाला आणि अनिल कपूर यांच्या 'द नाईट मॅनेजर' इंडियनला सर्वोत्कृष्ट वेब सीरीजचं नामांकन मिळालं आहे. यावर्षी भारतातून नामांकन मिळालेली ही एकमेव वेब सीरीज आहे. दरम्यान 21 देशांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या 14 श्रेणींमध्ये एकूण 56 नामांकनला यात मान्यता देण्यात आली. सर्वोत्कृष्ट वेब सीरीज पुरस्कारासाठी, 'द नाईट मॅनेजर'ची टक्कर 'लेस गौटेस डे डियू' (ड्रॉप्स ऑफ गॉड) (फ्रांस), 'द न्यूजरीडर - सीजन 2' (ऑस्ट्रेलिया) आणि 'इओसी, एल एस्पिया एरेपेंटिडो - सीजन 2' (अर्जेंटीना) या सीरीजबरोबर होईल.
आंतरराष्ट्रीय एमी अवॉर्ड्स 2024चं नामांकन जाहीर, 'द नाईट मॅनेजर'ची 'या' श्रेणीत झाली निवड - The Night Manager nominated - THE NIGHT MANAGER NOMINATED
2024 International Emmy Awards Nominees : आंतरराष्ट्रीय एमी अवॉर्ड्स 2024साठी नामांकित व्यक्तींची घोषणा करण्यात आली आहे. भारतातील 'द नाईट मॅनेजर' या हिट वेब सीरीजमधील अनिल कपूर, आदित्य रॉय कपूर आणि शोभिता धुलिपाला यांना नामांकन मिळालं आहे. संपूर्ण यादी वाचा सविस्तर...

Published : Sep 20, 2024, 10:47 AM IST
2024 आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कारांसाठी नॉमिनीज
- आर्ट प्रोग्रामिंग
- पियानोफोर्टे (पोलैंड)
- रॉबी विलियम्स (यूनाइटेड किंगडम)
- वर्जिलियो (अर्जेंटीना)
- हू आई एम लाइफ (जापान)
- सर्वोत्कृष्ट कामगिरी (अभिनेता)
- बेटिन्हो में जूलियो एंड्रेडे: नो फियो दा नवलहा (लिविंग ऑन ए रेजर एज) - ग्लोबोप्ले / एफ्रोरेगे ऑडियोविजुअल / फॉर्मेटा प्रोड्यूसोस ई कॉन्टेउडो
- हलुक बिलगिनर इन साहसियेट - सीजन 2 : अय यापिम
- टॅपी में लॉरेंट लाफिट : यूनाइट / नेटफ्लिक्स
- द सिक्स्थ कमांडमेंट में टिमोथी स्पाल : वाइल्ड मर्करी प्रोडक्शंस / ट्रू विजन
- सर्वोत्कृष्ट अभिनय (अभिनेत्री)
- एल अल्टिमो वैगन में एड्रियाना बाराजा - वू फिल्म्स / नेटफ्लिक्स
- आओकबाब-चुटिमोन चुएंगचारोएनसुकिंग इन हंगर - सॉन्गसाउंड प्रोडक्शन / नेटफ्लिक्स
- सारा गिरौडो इन टाउट वा बिएन (एवरीथिंग इस फाइन) - माउई एंटरटेनमेंट / फेडरेशन एंटरटेनमेंट
- जेसिका हाइन्स इन देयर शी गोज - मर्मन टेलीव्हिजन
- ड्रामा सीरीज
- लेस गाउट्स डे डियू (ड्रॉप्स ऑफ गॉड)
- द न्यूजरीडर: सीजन 2
- द नाइट मॅनेजर
- आईओसी, एल एस्पिया अरेपेंटिडो - सीजन 2
- कॉमेडी
- डेली डोज ऑफ सनशाईन
- डेडलोक
- डिविजन पलेर्मो
- एचपीआई - सीजन 3
- डॉक्यूमेंट्री
- लाफेयर बेटेनकोर्ट
- ओटो बैक्सटर: नॉट ए फकिंग हॉरर स्टोरी
- द एक्साइल्स
- ट्रांसो
- नॉन-स्क्रिप्टेड एंटरटेनमेंट
- डाई ब्रुग (द ब्रिज साउथ अफ्रीका)
- मी कैगो डी रिसा (एनीथिंग गोज)
- रेस्टोरेंट मिस्वरस्टैंड (द रेस्टोरेंट दैट मेक्स मिस्टेक्स)
- द समिट
- शॉर्ट-फॉर्म सीरीज
- क्वीन्स ऑफ द क्वीर अंडरग्राउंड
- ला विडा डे नोसोट्रास
- पंट डे नो रिटोर्न (पॉइंट ऑफ नो रिटर्न)
- केंशिरो नी योरोशिकु (से हेलो टू केंशिरो)
- स्पोट ड्रॉक्यूमेंट्री
- ब्रॉन: द इम्पॉसिबल फॉर्मूला 1 स्टोरी
- टैन सेर्कास डे ला न्यूब्स
- टूर डी फ्रांस
- हू आई एम पॅरालिम्पिक
न्यूयॉर्कमध्ये होईल विजेत्यांची घोषणा : भारतीय स्टँड-अप कॉमेडियन आणि अभिनेता वीर दास 2024 इंटरनॅशनल एमीज होस्ट करण्यासाठी सज्ज आहे. दरम्यान भारताव्यतिरिक्त अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, बेल्जियम, ब्राझील, चिली, कोलंबिया, डेन्मार्क, फ्रान्स, जर्मनी, जपान, मेक्सिको, नेदरलँड, पोलंड, सिंगापूर, दक्षिण आफ्रिका, दक्षिण कोरिया, स्पेन, थायलंड, तुर्की आणि युनायटेड किंगडम या देशांमधील नॉमिनीजचे नावे समोर आली आहेत. आता सर्वजण आणि नॉमिनी पॅनल सादरीकरणासाठी 22-24 नोव्हेंबर रोजी न्यूयॉर्कमधील आंतरराष्ट्रीय एमी वर्ल्ड टेलिव्हिजन फेस्टिव्हलमध्ये एका विशेष कार्यक्रमासाठी एकत्र येतील. यानंतर 25 नोव्हेंबर 2024 रोजी न्यूयॉर्कमध्ये विजेत्यांची नावे घोषित केली जाईल.