मुंबई - Vikrant Massey Become Father : अभिनेता विक्रांत मॅसी सध्या त्याच्या 'ट्वेल्थ फेल' चित्रपटाच्या यशाचा आनंद घेतोय. विक्रांत मॅसीच्या घरात सध्या आनंदाचे वातावरण आहे. विक्रांतची पत्नी शीतल ठाकूरनं 7 फेब्रुवारी रोजी मुलाला जन्म दिला आहे. लग्नाच्या 2 वर्षानंतर विक्रांत वडील झालाय. विक्रांत मॅसी आणि शीतल यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर त्यांच्या पहिल्या मुलाच्या स्वागताची घोषणा केली. 7 फेब्रुवारी रोजी सोशल मीडियावर याबद्दल माहिती सांगत त्यानं लिहिलं, ''आम्ही एक झालो आहोत, आम्हा दोघांचे प्रेम असलेल्या आमच्या मुलाच्या आगमनाने आम्ही आनंदाने भरून गेलो आहोत.''
विक्रांत मॅसीनं शेअर केली पोस्ट : विक्रांतनं शेअर केलेल्या पोस्टरमध्ये कँडी, इंद्रधनुष्य, लहान शूज, फीडिंग बाटली आणि खेळणी यासारख्या गोंडस गोष्टी आहेत. लग्न करण्यापूर्वी विक्रांत मॅसी आणि शीतल ठाकूर यांनी काही वर्ष डेट केलं. लग्नानंतरच्या आयुष्याविषयी बोलताना विक्रांतनं एका मुलाखतीत सांगितलं होतं की, ''माझे वैवाहिक आयुष्य खूप चांगले जात आहे. होय, माझ्या आयुष्यात बऱ्याच गोष्टी बदलेल्या आहेत. मी माझ्या जिवलग मित्राशी लग्न केलंय. मला नवीन घर मिळालं, त्यामुळे जीवन खूप चांगलं झालंय.'' या जोडप्याचं लग्न पारंपरिक पहाडी रितीरिवाजानं पार पडलं. 14 फेब्रुवारीला या जोडप्याच्या लग्नाला 2 वर्षे पूर्ण होत आहेत.