नवी दिल्ली- सरकारी तेल मार्केटिंग कंपन्यांनी पुन्हा एकदा व्यावसायिक सिलिंडरचे दर वाढविले आहेत. नव्या दरानुसार व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दर 16.5 रुपयांनी वाढले आहेत. हे नवे दर तत्काळ लागू झाले आहेत. घरगुती गॅस सिलिंडरचे दर वाढविण्यात आलेले नाहीत. त्यामुळे सामान्य नागरिकांना दिलासा मिळालेला आहे.
19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दर आजपासून 16.5 रुपयांनी वाढले आहेत. नव्या दरानुसार दिल्लीत व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दर आजपासून 1,818.50 रुपये असणार आहे. तर 5 किलो गॅस सिलिंडरचे दर 4 रुपयांनी वाढणार आहेत. दुसरीकडं 14.2 किलो घरगुती गॅस सिलिंडरचे दर 'जैसे थे' राहणार आहेत.
- कोणत्या कारणांनी गॅस सिलिंडरचे वाढतात दर- जागतिक बाजारातील कच्च्या तेलाचे वाढलेले दर, बाजारपेठेतील वाढती मागणी, डॉलरच्या तुलनेत रुपयाचे घसरलेले मूल्य आणि जागतिक बाजारपेठेतील बदलती स्थितीनुसार गॅस सिलिंडरचे दर बदलतात.
- दरवाढीचा कुणाला बसणार फटका- गेल्या महिन्यात 19 किलो व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दर 62 रुपयांनी वाढले. व्यासायिक सिलिंडरचा वापर हॉटेल, रेस्टॉरंटसह व्यावसायिक आस्थापना आणि लहान व्यवसायांमध्ये केला जातो. त्यामुळे व्यावसायिकांना या दरवाढीचा फटका बसणार आहे.