कॅलिफोर्निया Elon Musk Threatens To Apple : आयफोन निर्माता कंपनीचे टीम कुक यांनी ओपन एआय सोबत सोमवारी भागीदारी जाहीर केली. मात्र टीम कुक यांनी एक्सवर शेअर केलेल्या या पोस्टमुळे एक्सचे मालक आणि टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलन मस्क यांचा चांगलाच तिळपापड झाला. त्यांनी यावेळी अॅपलला चांगलंच फटकारलं. सुरक्षा उल्लंघनाशी कधीही तडजोड केली जाणार नाही. ओपन एआयचं हे अॅप तत्काळ हटवा, अन्यथा मी आमच्या कंपनीमधील अॅपल उपकरणांवर बंदी घालेल, अशी धमकी एलन मस्क यांनी दिली. एलन मस्क यांनी एक्सवर याबाबतचं आपलं मत स्पष्ट केलं. यावेळी त्यांनी युझरच्या सुरक्षेविषयी चिंता व्यक्त केली.
अॅपलच्या सगळ्या उपकरणांवर घालणार बंदी :ओपन एआय आणि अॅपल यांच्यात झालेल्या कराराची माहिती अॅपलचे मुख्य कार्यकारी अधिकारी टीम कुक यांनी एक्स या सोशल माध्यमांवर दिली. यावर एक्सचे मालक आणि टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलन मस्क यांनी जोरदार टीका केली. अॅपल आणि ओपन एआयच्या कराराला एलन मस्क यांनी विरोध केला. याची गरज नाही, सुरक्षेचं उल्लंघन अजित खपवून घेतलं जाणार नाही. हे भयानक स्पायवेअर थांबवा, नाहीतर मी माझ्या कंपनीतून अॅपलच्या सगळ्या उपकरणांवर बंदी घालेन, अशी धमकी एलन मस्क यांनी दिली.